Home > News update > पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई; जबरीने सोनसाखळी चोरी करणा-या आरोपींना ०२ तासात अटक व गुन्हयातील संपूर्ण मालमत्ता हस्तगत

पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई; जबरीने सोनसाखळी चोरी करणा-या आरोपींना ०२ तासात अटक व गुन्हयातील संपूर्ण मालमत्ता हस्तगत

Po. Action by the City of Ste. Washim; The accused of forcibly stealing gold chains were arrested within 02 hours and the entire property of the crime was seized.

पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई; जबरीने सोनसाखळी चोरी करणा-या आरोपींना ०२ तासात अटक व गुन्हयातील संपूर्ण मालमत्ता हस्तगत
X

वाशिम:-फिर्यादी नामे श्री. जयदिप उत्तम जाधव, वय २० वर्ष, धंदा- शिक्षण, रा. सराफा लाईन,काटीवेश, वाशिम यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली की, दि. १९/०९/२०२२ रोजी २०:२० वाजताच्या सुमारास ते त्यांच्या मित्रांसमवेत त्यांची स्कुटी क. एम. एच. ३७ वाय. ६९११ वर बसून लाखाळया वरून झाकलवाडी रोडने हरियाणा ढाबा येथे जेवायला जात असतांना अंदाजे २०:५० वाजताच्या सुमारास गुरूकूल शाळे जवळ, झाकलवाडी रोड, वाशिम येथे त्यांचे पाठीमागून एक टि. व्ही. एस. अपाचे लाल काळया रंगाच्या मोटारसायकल वर ०३ अनोळखी इसम बसून आले व त्यातील एकाने फिर्यादी यांच्या स्कूटीला लाथ मारून त्यांना खाली पाडले व त्या तिघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांच्या गळयातील ०८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व त्याला असलेले लॉकेट, किंमत अंदाजे ४०,०००/- रू. व फिर्यादी यांचा मित्र विरल मनोज भिमजियाणी याच्या गळयातील १० ग्रॅम चांदीची चैन, किंमत अंदाजे ९००/- रू. जबरीने तोडून घेउन पळून गेले. त्यानंतर फिर्यादी हे पोलीस स्टेशनला आले असता त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पो.स्टे. वाशिम शहर अप.क. ७२९ / २०२२, कलम ३९४,३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


त्यावरून रवी मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो. यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. रफीक शेख, प्रभारी ठाणेदार सपोनि राजेशकुमार गाठे यांनी सदर गुन्हयाच्या तपासाबाबत डि.बी. पथकास आदेश देउन रवाना केले असता डि.बी. पथकाने फिर्यादी श्री. जयदीप उत्तम जाधव यांचा मित्र नामे रवी विनोद मगर, वय २० वर्षे, धंदा - शिक्षण, रा. नगिना मशीदजवळ, वाशिम याच्या हालचाली व वागणे हे संशयास्पद वाटत असल्याने त्यास विश्वासात घेउन त्याच्याकडे सदर गुन्हयाच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याला जयदीप याच्या श्रीमंती बद्दल असुया वाटत असल्याने त्यानेच आरोपी नामे आदर्श जीवन कांबळे, रा. तोंडगाव, ता. जि. वाशिम याला जयदीप याच्या गळयातील सोन्याची चैन लुटण्याबाबत सांगितले होते व त्या अनुषंगाने त्याने काल दि. १९/०९/२०२२ रोजी आदर्श कांबळे व त्याच्या इतर दोन साथीदारांनी जयदीप च्या मोटारसायकलला लाथ मारून त्याला व त्याचा मित्र विरल भिमजियाणी याला खाली पाडले व जयदीपच्या गळयातील ०८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, किंमत रू.४०,०००/- व विरलच्या गळयातील १० ग्रॅम वजनाची चांदीची चैन, किंमत रु. ९००/- हिसकावल्याचे सांगितले.


विनोद मगर याचा सदर गुन्हयातील सक्रिय सहभाग निष्पन्न होत आहे. त्यानंतर डिबी पथकाने तोंडगाव,ता. जि. वाशिम येथे जाउन आदर्श जीवन कांबळे, वय २६ वर्षे यास ताब्यात घेउन त्याच्या इतर दोन साथीदारांबाबत माहिती घेतली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार अमोल दौलत इंगोले, वय २२ वर्षे व प्रवीण् रामसेवक चव्हाळे, वय २७ वर्षे दोघेही रा. तामसाळा, ता. जि. वाशिम यांच्या सोबत केल्याचे सांगितल्याने तामसाळा येथे जाउन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व नमूद आरोपीतांकडून फिर्यादी श्री – जयदीप जाधव यांच्या गळ्यातील जबरीने चोरलेली ०८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, किंमरू. ४०,०००/- व फिर्यादी यांचा मित्र विरल भिमजियाणी याच्या गळयातील जबरीने चोरलेली १० ग्रॅम वजनाची चांदीची चैन, किंमत रू. ९००/- व आरोपींनी सदरचा गुन्हा करताना वापरलेली टि.व्ही.एस. सुझुकी आर.टी.आर. अपाचे कंपनीची लाल-पांढ-या रंगाची विना नंबरची मोटारसायकल, किंमत रू. १,००,०००/- असा एकूण रू. १,४०,९००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह साो., अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. रफीक शेख व प्रभारी ठाणेदार सपोनि राजेशकुमार गाठे यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि २१० / ज्ञानदेव मात्रे, पो.शि.क. २४३ / विठ्ठल महाले व पो.शि.क. ३०३ / संदीप वाकुडकर यांनी प पाडली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 22 Sep 2022 3:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top