Home > News update > स्व.कोकिळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

स्व.कोकिळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

On the occasion of the first death anniversary of Swa.Kokilabai Thackeray, the health check-up camp was completed

स्व.कोकिळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
X

(फुलचंद भगत)

वाशिम:-दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी श्री. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा अंतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण शाळा, महाविद्यालयात 'स्व. कोकिळाबाई ठाकरे यांची प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष सुभाष ठाकरे यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे ऊद्धघाटन सकाळी ठिक १० वाजता श्री मोतीरामजी चंद्रभानजी ठाकरे विद्यालय कासोळा येथे केले. संस्थेचे सचिव चंद्रकांत ठाकरे जि.प. अध्यक्ष वाशीम यांनी यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुल मंगरूळपीर येथे केले.यावेळी राम ठाकरे, शीतल ठाकरे, डॉ. शेळके, डॉ. जामकर, श्रीकांत ठाकरे, प्राचार्य डॉ.एस.एच.कान्हेरकर, प्रा. ओमप्रकाश झीमटे, प्रा. डॉ. सुरेश चव्हाण, प्रा. डॉ. शरद वाघोळे, डॉ. प्रा. संजय इंगळे, प्रवीण कानकिरड, प्रमोद सुडके, माणिक भोयर, अर्चना गोदुवाले, शीतल निलटकर, सदानंद इंगोले, पूनम पुरोहित,माधुरी व्यास, संतोष पेठे, सुनील नाहटे, निवृत्ती भजने, बळीराम चव्हाण, प्राचार्य संजीवकुमार, प्रा. साहेबराव वंडे, प्रा. अरुण इंगळे,इत्यादी मान्यवर विविध ठिकाणी हजर होते.


आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सुभाष ठाकरे यांनी सांगितले की,'स्व.कोकिळाबाई ठाकरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस सामाजिक कार्य करून साजरा करावयाचा आहे.संस्थेच्या विविध शाळा, कॉन्व्हेंट, महाविद्यालयातून सर्वच सामाजिक स्तरातील गोर गरीब श्रीमंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे उत्तरदायित्व संस्थेकडे आहे. म्हणून त्याचे शिक्षणासोबत आरोग्य उत्तम असावे असे मला वाटते. तसेच स्व. कोकिळाबाई ठाकरे यांची पुण्यतिथी दिवशी किशोरवयीन मुलींचे आरोग्य चिकित्सा व्हावी असे संस्थेला अभिप्रेत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. काळबांडे वाशीम, डॉ. जाधव, डॉ. मोबीन खान, डॉ. अरविंद भगत, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न होत आहे. सचिव चंद्रकांत ठाकरे यांनी आपल्या मनोगतामधून स्व. मातोश्री यांची स्मृती संस्थेच्या अंतर्गत विद्यार्थी यांच्या मध्ये राहावी म्हणून आरोग्य चिकित्सा शिबीर उपक्रम रावविण्याचे ठरवण्यात आले.त्यामध्ये वाशीम जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने जर शिक्षण घेणाऱ्यापैकी कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी गंभीर आजाराने पिडीत असेल तर त्याच्यावर पुढील औषधोपचार किंवा सर्जरी करण्याची जरी वेळ आली तरी आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करून त्याला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.


आजच्या संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिरामध्ये संस्थेच्या संपूर्ण शाळा, महाविद्यालया मधून एकूण ४९३५ विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मुली २०४९ तर मुले २८८६ यांचा समावेश होता.यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात रक्तगट तपासणी शिबीर राबविण्यात आले


त्यामध्ये एकूण १३६ विद्यार्थांची तपासणी केली गेली. यशवंतराव चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय काजळंबा येथे सोबतच दन्त चिकित्सा व मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली.आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभातील डॉक्टर व मंगरूळपीर शहरातील डॉक्टर यांनी आपली सेवा दिली. त्यामध्ये डॉ. जयंत पिंपरकर, डॉ. एकता पिंपरकर, डॉ.नितीन बनचरे,डॉ.फुके,डॉ.सौ.फुके, डॉ. किसन सोनोने, डॉ. आशा सोनोने, डॉ. मनोज गट्टानी, डॉ. राम रत्नपारखी,डॉ. आशिष खोडके, डॉ. बी. के. व्यास, डॉ. जामकर, डॉ. देवळे, डॉ. शेळके, डॉ. सरनाईक, डॉ. मंजुषा वहऱ्हाडे, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. शेख, डॉ. राठोड, डॉ. कोल्हे, डॉ. चाटे, डॉ. आशिष जाधव, डॉ. विकास पतंगे, डॉ. सनी शर्मा,डॉ. अजमल, डॉ. तिडके, डॉ. श्रीमती महाकाळ, डॉ. हिंगोले, डॉ. अहिरकर, डॉ. जाधव, डॉ. बोरकर, डॉ. श्रीमती वानखडे, डॉ.ठाकरे, डॉ.गोडबोले, डॉ. महेश शिंदे तसेच त्यांचे सर्व वैद्यकीय चमूतील सहकारी यांनी आपली सेवा दिली.


सर्व मान्यवर शुभचिंतक, संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा प्रयत्नाने आरोग्य शिबीर संपन्न झाले.असे संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले येत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 22 Sep 2022 3:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top