Home > News update > नवनिर्वाचित विजयी पदवीधर आमदार धिरजभाऊ लिंगाडे यांचे प्रथम आगमनानिमित्त, लोककलावंताकडून उत्साहाने स्वागत.

नवनिर्वाचित विजयी पदवीधर आमदार धिरजभाऊ लिंगाडे यांचे प्रथम आगमनानिमित्त, लोककलावंताकडून उत्साहाने स्वागत.

On the first arrival of the newly elected victorious graduate MLA Dhirajbhau Lingade, an enthusiastic welcome by the folk artist.

नवनिर्वाचित विजयी पदवीधर आमदार धिरजभाऊ लिंगाडे यांचे प्रथम आगमनानिमित्त, लोककलावंताकडून उत्साहाने स्वागत.
X

कारंजा : अमरावती पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित विजयी आमदार धिरजभाऊ लिंगाडे यांचे कारंजा येथील प्रथम आगमनाचे निमित्ताने, विश्रामगृह कारंजा येथे, विदर्भ लोककलावंत संघटना आणि करंजमहात्म्य परिवाराच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.याबाबत अधिक वृत्त असे की, आधीपासूनच, सर्वच विभागातील कर्मचारी बांधवाच्या, 'एकच मिशन -जुनी पेन्शन' या विषयावर ठाम भूमिका घेऊन शासनाशी जुन्या पेन्शन या विषयावर संघर्ष करीत कर्मचाऱ्याना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न करणारे, अमरावती पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धिरजभाऊ लिंगाडे यांचे कर्मचारी व शिक्षकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने कारंजा येथील विश्रामगृहावर प्रथम आगमन झाले असता विदर्भ लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष संजय कडोळे, नंदकिशोर कव्हळकर, उमेश अनासाने, प्रदिप वानखडे. इ लोककलावंतानी शाल,पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करीत त्यांच्या विजयाचे स्वागत करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्रामगृह येथे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सचिव दिलिपराव भोजराज, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते राजाभाउ डोणगावकर, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, प्रदिप वानखडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेन्द्र पाटील ताथोड, जि. प. सदस्य दत्तात्रय पाटील तुरक, पंचायत समिती सभापती प्रदिपभाऊ देशमुख, शहर काँग्रेसचे आमिर पठाण, राष्ट्रवादीचे कानकिरड युवतीसेनेच्या प्रियाताई महाजन व महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्याची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना धिरजभाऊ लिंगाडे यांनी, "सर्वप्रथम माझ्या विजयाकरीता महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी सहकार्य केले तसेच शिक्षक व पदविधर यांनी विश्वास दाखवीला. माझा विजय धनशक्ती विरूध्द जनशक्ती असा झाला त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार आहे. असे स्पष्ट आभार व्यक्त करीत माझा पदवीधर मतदार संघ मोठा असून मी मतदार संघातील प्रत्येक जिल्हयात तालुक्यात संपर्क ठेऊन नेहमी महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांशी संवाद ठेऊन नागरिकांची कामे लवकरात लवकर पूर्ण कशी होतील यावर भर देऊन कार्यरत राहणार असल्याचे सांगीतले. असे वृत्त उमेश अनासाने यांनी कळवीले आहे.Updated : 19 March 2023 12:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top