Home > News update > जावेद अन्सारी मित्र परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य व मिठाईचे वाटप करून आ.डाॅ.वजाहत मिर्झा यांचा वाढदिवस साजरा.

जावेद अन्सारी मित्र परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य व मिठाईचे वाटप करून आ.डाॅ.वजाहत मिर्झा यांचा वाढदिवस साजरा.

On behalf of Javed Ansari Mitra Parivar, Dr. Wajahat Mirza's birthday was celebrated by distributing materials and sweets to school students.

जावेद अन्सारी मित्र परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य व मिठाईचे वाटप करून आ.डाॅ.वजाहत मिर्झा यांचा वाढदिवस साजरा.
X

यवतमाळ -: यवतमाळ येथील पोबारु लेआउट मधील उर्दू हायस्कूल मध्ये जावेदभाई अन्सारी मित्र परिवार यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष,वक्फ बोर्डचे अध्यक्ष आ.डॉ.वजाहतभाई मिर्झा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी हम हम विद्यार्थी मित्र बालमित्र विद्यार्थीगन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढदिवसावर होणारा अवाढव्य खर्च टाळत वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप एक आदर्श निर्माण करण्यात आला. शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना महाराष्ट्र प्रदेश सचिव जावेदभाई अन्सारी म्हणाले की आ.डाॅ.वजाहत मिर्झा यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करत काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राहुल ठाकरे हे होते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसमोर विविध कार्यक्रम सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी व उपस्थिततांनी आ.डॉ.वजाहत मिर्झा यांच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला हाजी अब्दुल जाकिर साहब,मकसूद पटेल,प्राध्यापक बबलू देशमुख,समाज सेवक हाफिज भाई ,पल्लवीताई रामटेके, बबली भाई, मुजफ्फर पटेल, वसीम मवाल,आरिफ खान पठान, इमरान पटेल,अहमद शाह,अतहर इकबाल ,मुजफ्फर सर,वसीम सर, तारिक सर, शरीक सर, साजेदा टीचर,रूमाना टीचर आदी उपस्थित होते.Updated : 21 Sep 2022 3:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top