Home > News update > लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

कु.ऊन्नती पाकधनेच्या यशाचे सर्व स्तरातुन कौतुक

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला
X

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

कु.ऊन्नती पाकधनेच्या यशाचे सर्व स्तरातुन कौतुक

मुलीच्या यशासाठी पंचक्रोशीतुन कौतुकाची थाप

(फुलचंद भगत)


वाशिम:-मुलीला नकोशी म्हणून बघणारेही ऊच्चशिक्षितही आजही समाजात दिसतात परंतु मंगरुळपीर येथील पाकधने परिवाराने डाॅ.कु.ऊन्नती विणा मिलिंद पाकधनेच्या बॅचलर आॅफ फिजीओथेरेफी मध्ये मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल फटाक्याची आतिषबाजी करत लाडुतुला करुन पेढे वाटुन आनंद साजरा करुन यशाचे कौतुक करत मुलींनाही समाजात सारखाच दर्जा मिळावा असा आदर्श समाजापुढे निर्माण केला.


वंशाला दिवा हवा या मानसिकतेत आजही पांढरपेशा समाज वावरत आहे.मुलींना दुय्यम स्थान देवून नकोशी म्हणून हिनवन्याचा प्रकार सर्यास होतांना दिसतो.परंतु याला मंगरुळपीर तालुक्यातील पाकधने परिवार अपवाद आहे.कारण मंगळसा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी गावातील प्रथम डाॅक्टर स्वर्गीय शोभाताई हरिनारायण मारोती पाकधने यांची नात डाॅक्टर ऊन्नती विणा मिलिंद पाकधने हिने बॅचलर आॅफ फिजीओथेरेपी मध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या ऊपस्थीतीत गुणगौरव सोहळा पार पडला.फटाक्याची आतीषबाजी करुन कुमारी ऊन्नतीचा लाडुतुला करुन पेढे भरवण्यात आले.मुलीही प्रत्येक क्षेञात अग्रेसर असुन शिक्षणामुळे ऊच्चस्थानी पोहचल्या आहे.प्रत्येकांनी शिक्षणाची कास धरुन विकास साधावा व समाजामध्ये मुलांमुलीमध्ये भेद न करता समान दर्जा द्यावा असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी तालुका काॅग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष मीलिंद पाकधने,प्रदेश प्रतिनीधी अॅडव्होकेट प्रकाश इंगोले,जावेद सौदागर,अब्दुल सादिक,आझमभाई,सौ.विणाबाई,कविश्वर पाकधने,तृषाली पाकधने,धनश्री पाकधने,भक्ती नरेश ठाकरे,आयुष,साई,भक्ती,ज्योतीताई ठाकरे, आदीसह मान्यवरांची ऊपस्थीती होती.कु.ऊन्नती ही आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणी आईवडिलांना देते.या घवघवीत यशामुळे सर्व स्तरातुन ऊन्नतीवरकौतुकाचा वर्षाव होत असुन मुलींना शिक्षणामध्ये नेहमी प्रोत्साहन देणार्‍या पाकधने परिवाराचेही कौतुक होत आहे.कु.उन्नतीलाही लहानपणापासुनच समाजसेवेची आवड असुन मुलींनी शिक्षणाची कास धरुन जिद्द आणी चिकाटीने ध्येय साध्य करा असे आवाहन केले आहे.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 9 Aug 2022 7:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top