Home > News update > श्री संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या मेळाव्याचे, जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना, कारंजेकरांनी दिले निमंत्रण

श्री संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या मेळाव्याचे, जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना, कारंजेकरांनी दिले निमंत्रण

Karanjekar invited all the people's representatives of the district to the meeting of Sri Sant Namdev Tukaram Warkari Parishad.

श्री संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या मेळाव्याचे, जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना, कारंजेकरांनी दिले निमंत्रण
X

श्री संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या मेळाव्याचे, जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना, कारंजेकरांनी दिले निमंत्रण


कारंजा : कारंजा येथे, शनिवार दि.३ डिसेंबर २०२२ रोजी, ठिक सकाळी १०:०० वाजता स्थानिक श्री एकवीरा देवी मंदिर, माळीपूरा कारंजा येथे बंटीभाऊ उर्फ सत्यजित गाडगे यांच्या सहकार्याने, दिव्यांग दिनी, मराठा सेवा संघ प्रणित,श्री संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचा मेळावा होऊ घातलेला असून, सदरहू मेळाव्याला, मराठा सेवा संघ वाशिमचे जिल्हाध्यक्ष शिवश्री नारायणराव काळबांडे , श्री संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शिवश्री हभप श्रीकृष्ण महाराज राऊत , कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार, शिवश्री राजेंद्र पाटणी, वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवश्री लखनजी मलिक, शिक्षक आमदार, ऍड, शिवश्री किरणराव सरनाईक, युवकांचे प्रेरणास्थान असलेले आमदार शिवश्री अमित झनक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, कारंजा नगरीतील सर्वच माजी नगराध्यक्ष यांना संत नामदेव तुकाराम वारकरी मेळाव्याची प्रमुख संकल्पना देऊन, निमंत्रण देण्यात आले आहे. मोठ्या संख्येने अचूक वेळेवर सर्व निमंत्रीत पाहुणे हजर राहणार आहेत . या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती जयकिसनभाऊ राठोड हे असून, सदरहू मेळाव्या द्वारे , धार्मिक व आध्यात्मिक प्रचार प्रसार, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, शांती सलोखा, व्यसनमुक्ती, दिव्यांग सेवा व वयोवृद्ध आई वडीलांची सेवा याबाबत जागरूकता केली जाणार असून, केवळ कारंजा शहरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भात होणारा हा मेळावा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा ठरण्याची शक्यता आहे . सदरहु कार्यक्रमाला पंचक्रोशितील आणि जिल्ह्यातील वारकरी मंडळासह, भजनी मंडळे, उपस्थित राहणार असून, श्रीक्षेत्र वृंदावन येथील दिव्यांग किर्तनकार हभप कु चित्राताई महाराज वाकोडे यांच्या सुमधूर वाणीतून किर्तन व नंतर श्री नवरात्रोत्सवानंतरचा जय भवाणी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळा कडून, दि .03 डिसेंबर रोजी दुपारी तिन वाजता प्रसाद होणार आहे . कारंजा येथे होणारा हा वारकरी मेळावा आनंदोत्सवात साजरा व्हावा . याकरीता आयोजकाचे प्रयत्न सुरु असून कारंजा येथे होणार्‍या या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाला येतांना सर्व भाविक वारकरी मंडळींनी वारकरी गणवेशातच, पांढरा कुर्ता पैजामा टोपी घालून आणि भजनी साहित्य टाळ, मृदंग, विणा घेऊनच येण्याची कृपा करावी असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. सदरहु कार्यक्रमात सर्वप्रथम दिंडी, उद्‌घाटन सोहळा, वारकरी पुरस्कार सन्मान सोहळा, साप्ता . करंज महात्म्यच्या वारकरी विशेषांकाचे प्रकाशन, भजनाचा कार्यक्रम, गांधी चौक येथील करंजमहात्म्य कार्यालय उद्घाटन आदी कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. स्वतःची आर्थिक, मानसिक, शारिरिक परिस्थिती नाजूक असतांही दिव्यांग असलेले कार्यक्रमाचे आयोजक शिक्श्री हभप संजय म कडोळे हे स्वतःच्या तहाण भुकेची पर्वा न करता, "बल तो बल अपना बल" या उक्तीने वारकरी मेळाव्या करीता अपार मेहनत घेत आहेत. तरी सदर्हू मेळाव्याला इच्छुक दानशूर व्यक्तिंनी तन मन धनाने आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहेत. असे वृत्त प्रसिद्धी प्रमुख शिवश्री उमेश अनासाने यांनी कळविले आहे .

Updated : 23 Nov 2022 7:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top