Latest News
Home > News update > पोदार जम्बो किड्स मध्ये इंटरनॅशनल मड डे मध्ये साजरा

पोदार जम्बो किड्स मध्ये इंटरनॅशनल मड डे मध्ये साजरा

Celebrated at International Mud Day at Podar Jumbo Kids

पोदार जम्बो किड्स मध्ये इंटरनॅशनल मड डे मध्ये साजरा
X

पोदार जम्बो किड्स मध्ये इंटरनॅशनल मड डे मध्ये साजरा

यवतमाळ प्रतिनिधी दि ४ जुलै -: पोदार जम्बो किड्स इंटरनॅशनल यवतमाळ च्या वतीने मडे डे साजरा करण्यात .आला यानिमित्ताने अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले, प्रत्येक खेळात विद्यार्थ्याने पालकांसोबत उत्स्फूर्त सहभाग घेतला. आजच्या या भौतिक उपकरणाच्या युगात जिथे मोबाईल आणि यांत्रिकी उपकरणांमध्ये विद्यार्थी आपला वेळ घालवतात ,परंतु मड डे साजरा करताना ते निसर्गाशी एकरूप झाले. आणि मंत्रमुग्ध होऊन आनंद लुटला तसेच पालकांनीही आपले लहानपण पुन्हा एकदा अनुभवले. या कार्यक्रमात चिखलातून चालणे, मड पेंटिंग, मड बेकरी, हॅन्ड प्रिंट ,ट्रेझर फिंगर प्रिंट अंडर मॅग्निफाईंग ग्लास इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना पोद्दार जम्बो किड्सच्या संचालिका स्वाती पोपट वत्स यांची होती. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अंकिता सूचक आणि शिक्षिका यांच्या समावेत एडमिन ऑफिसर सरध बाबू यांच्या सहकार्याने केले .हा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य प्रफुल्ल चपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकांच्या उत्साह पूर्ण उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाला.

Updated : 5 July 2022 5:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top