Home > Latest news > मुल शहरातील आठवडी बाजार व भाजी मार्केट बांधकामासाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत

मुल शहरातील आठवडी बाजार व भाजी मार्केट बांधकामासाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत

Remaining Rs 4 crore for the construction of weekly market and vegetable market in the child city. Funds disbursed

मुल शहरातील आठवडी बाजार व भाजी मार्केट बांधकामासाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत
X




वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे फलीत


येत्‍या दोन महिन्‍यात होणार लोकार्पण

मुल नगर परिषद क्षेत्रातील आठवडी बाजार व भाजी मार्केटचे बांधकाम करण्‍यासाठी मंजूर ११ कोटी रू. निधीपैकी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. शासनाच्‍या नगरविकास विभागाने दिनांक १९ सप्‍टेंबर २०२२ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर मुल शहरातील आठवडी बाजार व भाजी मार्केटच्‍या बांधकामाला या निधीच्‍या माध्‍यमातुन गती प्राप्‍त होणार आहे.

श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात दिनांक १७ नोव्‍हेंबर २०१७ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये नगर परिषदांना वैशिष्‍टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत मुल शहरात आठवडी बाजार व भाजी मार्केटच्‍या बांधकामासाठी ११ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. सदर विकासकामासाठी ७ कोटी रू. निधी खर्च करण्‍यास दिनांक २३ मे २०१७ च्‍या नगरविकास विभागाच्‍या पत्रान्‍वये मान्‍यता देण्‍यात आलेली आहे. मंजूर ११ कोटी निधीपैकी ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांच्‍या मार्फत दिनांक १४.१०.२०२१ रोजीच्‍या पत्रान्‍वये शासनाला प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला होता. वने तथा सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात प्रयत्‍नपूर्वक पाठपुरावा करून मुल शहरातील आठवडी बाजार व भाजी मार्केट बांधकामासाठी ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यास शासनाची मान्‍यता प्राप्‍त केली आहे.

मुल शहराच्‍या विकास वैभवात या आठवडी बाजार व भाजी मार्केटच्‍या माध्‍यमातुन भर घातली जाणार असून येत्‍या दोन महिन्‍यात या विकासकामांचे लोकार्पण करण्‍यात येणार असल्‍याचे वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. मुल शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी आपण वचनबध्‍द असून हे शहर राज्‍यातील सर्वाधिक विकसित शहर म्‍हणून लौकीकप्राप्‍त ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Updated : 2022-09-21T13:10:22+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top