Home > National > उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी

उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी

Release Umar: Noam Chomsky, Rajmohan Gandhi's demand

उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
X

नवी दिल्लीः सीएए, एनआरसी आंदोलनात भाग घेऊन दिल्ली दंगल भडकवण्याचा आरोप असलेला जेएनयूचा माजी विद्यार्थी व कार्यकर्ता उमर खालिद याची सुटका करावी अशी मागणी जगातल्या चार महत्त्वाच्या संघटनांसह विख्यात विचारवंत नॉम चॉम्स्की व म. गांधी यांचे नातू राजमोहन गांधी केली आहे. चॉम्स्की व राजमोहन गांधी यांनी उमरच्या अटकेवर नाराजीही व्यक्त केली आहे.

उमरच्या सुटकेची मागणी करणाऱ्या चार संघटना हिंदूज फॉर ह्युमन राइट्स, इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल, दलित सॉलिडॅरिटी फोरम व इंडिया सिव्हिल वॉच इंटरनॅशनल अशा असून त्यांनी उमरची लगेच सुटका करावी अशी विनंती भारत सरकारला केली आहे.

चॉम्स्की यांनी उमरच्या सुटकेसंदर्भात म्हटले आहे की, भारतात लोकशाही संस्थांवर शासनयंत्रणाचा वाढता दबाव असून तो न्याय व्यवस्थेवरही दिसत असून तो चिंता व्यक्त करणारा दिसत आहे. जनतेचे हक्क, त्यांच्या मागण्या हा लोकशाही हक्क असून भारत हा सेक्युलर लोकशाही देश असतानाही हिंदू बहुसंख्याकवाद सर्वांवर थोपवला जात आहे. उमर खलिद घटनात्मक अधिकारासाठी संघर्ष करत होता, त्याला मतस्वातंत्र्याचा, आंदोलनाचा मूलभूत अधिकार नाकारला जात आहे. लोकशाही स्वीकारलेल्या व मुक्त समाज असलेल्या कोणत्याही देशात नागरिकाला हे अधिकार सर्वोच्च असतात, ते त्यांना प्रदान करणे व त्याचे संरक्षण करणे ही शासन यंत्रणेची जबाबदारी असल्याचे चॉम्क्सी यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात संशोधक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या राजमोहन गांधी यांनीही उमरच्या सुटकेसंदर्भात एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला असून यात उमर याने पीएचडी अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले आहे, अत्यंत कुशाग्र, बुद्धिमान, संवेदनशील असलेला हा भारतीय युवक गेले २० महिने तुरुंगात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या जगभरात अधिकारशाही व समानता यामध्ये संघर्ष उडालेला दिसून येत आहे. हा संघर्ष अधिकारशाही विरुद्ध लोकशाही मूल्ये असाही दिसून येतो. भारत हा अशा लढ्यांचा केंद्रबिंदू झाला असून उमर साऱख्या हजारो लोकशाही हक्कासाठी लढणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. हा लोकशाहीला धक्का असून तो मानवी प्रतिष्ठा व भारताची बहुसांस्कृतिक प्रतिमा यांना छेद देणारा असल्याची प्रतिक्रिया राजमोहन गांधी यांनी दिलेली आहे.

Updated : 4 July 2022 9:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top