'वंडरकिड्स मोन्टेसरी हाऊस ऑफ चिल्ड्रेन यवतमाळ'ला ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड्सने सन्मानित!!!
'Wonderkids Montessori House of Children Yavatmal' honored with Global Education Awards!!!
X
दि.21 जानेवारी......
स्थानिक यवतमाळ शहरातील नामांकित असलेली प्री प्रायमरी (पूर्व प्राथमिक) शाळेला या वर्षीचा शिक्षण क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी देश भरातील असंख्य संस्था आपापली नोंदणी करतात. या पुरस्काराचे निकष एक आंतरराष्ट्रीय समिती ठरवत असते. त्या समितीने ठरवलेले निकष पुर्ण करावे लागते. ज्यामध्ये वर्ग खोल्यातील सुयोग्य वातावरण,अध्यापनातील उत्कृष्टता, शैक्षणिक क्षेत्रातील समर्पण,नवकल्पना, शैक्षणिक व सामाजिक वचनबद्धता, शिक्षकांची मेहनत आणि चिकाटी इत्यादी निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. वंडरकिड्स मोन्टेसरी हाऊस ऑफ चिल्ड्रेनने वरील पुर्ण निकषांची पूर्तता केली असून या वर्षीच्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड्स ला पत्र ठरली आहे.
या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या पुरस्कारामुळे संस्थेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे संस्थाध्यक्ष श्री. प्रकाशजी जाजू, सचिव श्री. आशिषजी जाजू, संचालिका सौ. शिल्पा आशिष जाजू, वंडरकिड्स मोन्टेसरीच्या पर्यवेक्षिका अवणी रायचुरा, मंजुषा जयस्वाल, सीमा रॉय आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन सर्व स्तरातून केले जात आहे.
एवढेच नव्हे तर शहरातील पालकांनी देखील या शाळेचीच पसंती दर्शविली आहे.