Home > Maharashtra news > प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील वृक्षारोपण करुन ग्रामपंचायतीने संगोपण केलेल्या झाडांची डाॅ,ए.एन.एम व आरोग्य सेवीके कडुनच कत्तल...

प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील वृक्षारोपण करुन ग्रामपंचायतीने संगोपण केलेल्या झाडांची डाॅ,ए.एन.एम व आरोग्य सेवीके कडुनच कत्तल...

The trees nurtured by the Gram Panchayat by planting trees in the Pradhan Sangvi health sub-center were cut down by Dr., ANM and health workers ...

किनवट (तालुका प्रतिनिधी)


एकीकडे संपुर्ण विश्वात प्रत्येक देश प्रदुषणाची झळ सोसत असल्यामुळे वृक्शारोपणावर भर देत आहे त्यातच आपला देश व देशातील प्रशासन दरवर्षी विविध योजना अंतर्गत वेगवेगळ्या विभागामार्फत कोट्यावधीचा निधी खर्च करुन झाडे लावा झाडे जगवा या उक्तीनुसार गावागावात वृक्ष लावुन त्यांना वाचवण्यात पुर्ण शक्ती लावत असताना किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील काही कर्मचा-यांनी मात्र कहरच केला कुणालाच कल्पना न देता गावातील पे्टरोलवर चालणा-या मशीन धारकांना गुत्ते देवुन चक्क झाडेच कापुन टाकली.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की,किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी हे काही वर्षापुर्वी मुख्यमंत्री दत्तक असलेले गाव ज्यात स्मार्ट व्हिलेज या योजनेत दहा लाखांच बक्शीसही मिळवळ. विविध विकास कामे व योजना राबवुन शाळा,अंनवाडी,आरोग्य केंद्रात सर्व सुखसुवीधा पुरवलेल्या आहेत.त्यातच काही वर्षा पुर्वी ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्राच्या आवारात संरक्षक भिंतीच्या कडेने सुंदर वृक्षारोपण करुन ती झाडे वाचवलीसुद्धा चहुबाजुंनी थंडगार सावली देणा-या झाडाखाली उन्हाळ्यात गावकरी,मुले विसावा घेत होती.पण कुठुन दुर्बुध्दी सुचली अन् नियमीत कर्तव्य न बजावता महीण्या पंधरा दिवसातुन क्वचीतच येणा-या डाॅ.ईर्शाद खान,ए.एन.एम खोत व सेवीका राधाबाई मुसळे यांनी संगनमत करुन कटाई मशीनवाल्यांना काही पैसे व निघणारे जळतन तुम्हालाच असा साैदा करत चक्क झाडांची बुंध्यातुनच कत्तल केली.

हि बाब कळताच गावातील काही पर्यावरण प्रेमी सुजाण नागरीकासह पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांनी संबधीतांना संपर्क केला तर थातुर मातुर उत्तरे देत फोन कट केला याला नेमक जबाबदार कोण ? ग्रामपंचायत,वनविभाग किंवा आरोग्य विभागातील कुणाची परवाणगी घेतली का? स्वताच कर्तव्यात कसुर करुन सतत गैरहजर राहणारे कर्मचारी एवढी मोठी झाडे कुणालाच कल्पना न देता कशी तोडु शकतात? या प्रकरणात संबधीत यंत्रणेने लक्ष घालुन जर काही कार्यवाही नाही केली तर गावातील नागरीकांसह पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे हे लवकरच उपोषण ही करतील असे त्यांनी तालुका आरोग्य अधीकारी,वनपरीक्शेत्र अधीकारी यांना कळविले आहे.आता 'झाडे लावा झाडे जगवा' म्हणनारे प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे तमाम पर्यावरण प्रेमीजनतेचे लक्ष लागले आहे.

Updated : 30 Jun 2022 4:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top