वाशिम येथे पार पडलेल्या सामुदायीक विवाह सोहळ्यास वाशिमच्या सोमानी परिवाराचे भरिव योगदान
गरीबांच्या लग्नासाठी लाखोंची केली मदत
X
फुलचंद भगत
वाशीम:-सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा वाशिमला व्हावा आणी गरीब कुटुंबियातील मुलांमुलींची लग्ने या मेळाव्यामध्ये करुन त्यांना मदत व्हावी हा हेतु सोमानी परिवाराचा होता.समितीच्या वतीने वाशिमच्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात 24 फेबु्रवारी रोजी पार पडलेल्या सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळयामध्ये शेकडो लग्ने लावुन मुलींचे कन्यादान वाशीमच्या या ऐतिहासीक नगरीत व पवित्र भुमिमध्ये साकार झाले.
बालवयापासुनच समाजसेवेचे व्रत घेतलेले निलेश सोमानी यांनी अनेक सामाजीक ऊपक्रम राबवुन लोकहितवादी कार्य केले.दरवर्षी आदीवासी भागात जावुन तेथील गरीबांना मदत ते करीत असतात.त्यांना या कार्यासाठी प्रोत्साहन आणी खांद्याला खांदा लावुन साथ देणार्या त्यांच्या सहचारीनीही सौ.भारती सोमानीही समाजसेवेचे व्रत घेवून कार्य करतात.वाशिमच्या भुमीत सर्वधर्मीय विवाह सोहळा होणार असल्याने त्यांनी दातृत्व वृत्तीने या कार्यात सोमानी कुटुंबियांनी स्वतःला झोकुन घेतले.गरीबांच्या मुलामुलींच्या लग्नाला आपलाही सहभाग लागावा म्हणून त्यांनी भरगोस मदत केली.सोहळ्यासाठी लागणारे साहित्य,जेवणासाठीचे साहित्य,पञावळी,द्रोण आणी रोख मदतही या सामुदायिक विवाह सोहळ्याला निलेश सोमानी यांनी केली.सदर विवाह सोहळयाच्या सभा मंचावर उद्घाटक म्हणून यवतमाळ-वाशिम खासदार भावनाताई गवळी,माजी मंत्री सुभाष ठाकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी, पिरिपाचे कवाडे गटाचे संस्थापक आ. जोगेंद्र कवाडे, शिक्षक आ.अॅड. किरण सरनाईक, उद्योजक देवेंद्र खडसे पाटील, माजी आ. विजयराव जाधव, मा.आ. पुरूषोत्तम राजगुरू, सर्वधर्मिय विवाह सोहळा समितीचे सरचिटणीस निलेश सोमाणी, व्यापारी मंडळ जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, उद्योजक संजय रूहाटिया,सौरभ रूहाटिया, रामदास चांदवानी, गिरधारीलाल सारडा, आचार्य विजयप्रकाश दायमा, रिपाई कवाडे गट जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, जयप्रकाश अग्रवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानझोडे, महादेव ठाकरे, भागवत गवळी, राम जगदाळे, श्याम दुरतकर, प्रकाश महाले, आर.बी. गायकवाड, शुभांगी ठाकरे, युवा सेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, डॉ. हरिष बाहेती, उद्योजक मिलींद भावसार, शिवलाल भुतडा, राजुभाऊ चौधरी, मनसे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ किडसे, वसंतराव धाडवे, नगरसेवीका सौ. निकमताई, निकम, सरपंच शरद गोदारा, सौ. प्रमिलाताई खडसे, सौ. भारती सोमाणी, सौ. वृषाली टेकाळे, मीनाताई उलेमाले,अॅड. सुरेश टेकाळे, राजु अवताडे, विठ्ठलराव अवताडे, महादेव हरकल, सरकार इंगोले,भन्ते महाकष्यप भंतेजी, उद्योजक रामदास चांदवानी, दिलीप जोशी , मोहित कर्णावट, आशिष हुरकट, अनिल केंडळे, समवेत मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचा संविधान व शाल देवून सत्कार करण्यात आला.आपल्याला मुलगी व बहिण नाही मात्र एका प्रसंगातून सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळयाची संकल्पना डोक्यात आली. संपूर्ण परिवार व समितीचे पदाधिकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतल्याने आज हा सोहळा यशस्वी झाला आहे. आपण सदैव सामाजिक बांधीलकीतूनच अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.यावेळी खा. गवळी यांच्याहस्ते सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या वाढदिवसानिमीत्त संविधान भेट देवून सत्कार करण्यात आला.प्रा. दयाराम गव्हाणे यांच्या कुश पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. माजी मंत्री ठाकरे, आ. पाटणी, आ. सरनाईक, आ. कवाडे, माजी आ. जाधव यांनी आपल्या विचारातून सर्वधर्मिय विवाह सोहळा व सर्व टिमचे अभिनंदन केले. आज हा नवा इतिहास रचला गेला असून खर्या अर्थाने या उपक्रमाची समाजाला गरज आहे. कर्जबाजारी व अन्य कारणाने आत्महत्याचे प्रमाण वाढत असून काळाची गरज ओळखून टिमने अतिशय नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करून हा सोहळा यशस्वी करून दाखविला. या प्रसंगाची नोंद झाली असून निश्चितच सर्व टिमला याचे श्रेय जात असल्याचे निलेश सोमानी यांनी सांगितले. खा. गवळी यांनी या उपक्रमामागची भूमिका विषद करून आपण या आयोजनामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. पुढील वर्षी वाशीमला यापेक्षा मोठा सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळयाचे आयेाजन करणार असल्याची घोषणाही केली. यावेळी सर्व वरवधुंना संविधान व साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अजिम राही , निलेश सोमाणी तर आभार देवेंद्र पाटील खडसे, व सावके यांनी मानले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. इतिहासाच्या या अभूतपूर्व सोहळयाचे साक्षीदार होण्याची भाग्य मिळाल्याच्या आनंद प्रत्येक जण व्यक्त करीत होता.कार्यक्रम यशवितेसाठी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
प्रतीनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206