Home > Maharashtra news > जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून द्या ग्रामीण शेतकऱ्यांची मागणी!

जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून द्या ग्रामीण शेतकऱ्यांची मागणी!

अन्यथा विद्युत भवन वीज कार्यालयावर उग्र् आत्मदहन आंदोलन करणार

जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून द्या ग्रामीण शेतकऱ्यांची मागणी!
X

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी✒️

आज दिनांक एक डिसेंबर 2022 रोजी शेंबाळ पिंपरी सर्कल येथील बांधव यांनी विद्युत भवन येथे येऊन रब्बी हंगामात सिंचना साठी पाणी आहे परंतु वीज सुरळीत नाही यासाठी ट्रांसफार्मर, लोड शेडिंग, अश्या विविध समस्या निर्माण झाल्याने, त्या लवकर सुरळीत करण्यासाठी शेतकरी बांधवांनी विद्युत भवन श्रीरामपूर पुसद् येथिल कार्यालयात आक्रोश व्यक्त केला.

सविस्तर वृत्त असे की यावर्षी पाऊस अधिक झाल्याने पावसाळ्यातील पिके अतिवृष्टीमुळे कुजून व सडून गेली परंतु रब्बी हंगामात का होईना रब्बी हंगामाच्या पिकासाठी आस लावून बसलेला आहे.


आज पाणी आहे परंतु शेतीच्या सिंचनासाठी वीज गायब आहे ग्रामीण भागात आधीच लोड शेडिंग ने परेशान झालेल्या शेतकऱ्यांपुढे वीजगळती, ट्रांसफार्म जळणे, आधी समस्या उभ्या राहिल्याने शेतकरी पूर्ण डबघाईस आलेला आहे.

शेती करायची तरी कशी हा मोठा प्रश्न आज विजेच्या अभावी निर्माण झाला आहे मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना ही मरण यातना देण्याचे काम महावीज वितरण कंपनीच्या माध्यमातून चालत आहे शेतकरी ट्रांसफार्मर च्या मागणीसाठी पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्यासाठी कार्यालयावर धडकत आहे यावरून या मागणीची संवेदनशीलता किती आहे हे लक्षात येते स्थानिक नेत्यांना व जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाला याचं काहीच गांभीर्य दिसत नाही आज पाणी आहे पण वीज नाही हाडाच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांना जीव घेण्या कडाक्याच्या थंडीमध्ये वन्यजीवाचा धोका पत्करून रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांना शेतीला सिंचन करावि लागत आहे शेतकऱ्यांना कायदा हातात घ्यायला लावू नका जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून द्या अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

आपल्या विजेच्या मागणीसाठी व पुरवठ्यासाठी वन वन भटकावे लागते या समस्या सोडवण्यासाठी या भागातील आमदार हिरारीने भाग घेऊन सकारात्मक समस्या केव्हा सोडवतील ?? की शेतकऱ्यांना आंदोलन मोर्चे करायला लावतील अशी खंत उपस्थित शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. यावेळी शेंबाळ पिंपरी ईसापुर सर्कल येथील शेतकरी सखाराम काशिनाथ वारकड व सहकारी शेतकरी बांधव उपस्थित होते.


Updated : 1 Dec 2022 8:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top