Home > Maharashtra news > *कायदा सक्षम तरी आरोपी मोकाटच*

*कायदा सक्षम तरी आरोपी मोकाटच*

*The accused is free even if the law is competent*

*कायदा सक्षम तरी आरोपी मोकाटच*
X

*कायदा सक्षम तरी आरोपी मोकाटच*

संपादक :- वर्धा जिल्हा इकबाल पहेलवान

समुद्रपूर :- वन्यजीवांच्या शिकारींवर निर्बंध आणण्यासाठी केलेला वन्यजीव संवर्धन कायदा जगभरातील सर्वोत्तम कायद्यांपैकी एक आहे. मात्र, शिकार करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक असलेली तपास यंत्रणा, वन कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती, तपासातील अडथळे अशा अनेक त्रुटींमुळे कायद्यातून पळवाटा काढून शिकार करणारे आरोपी मोकाट फिरत आहेत.

जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील झुडपी जंगलात

निर्दयीपणे वाघाचे तुकडे करण्यात आले होते त्या प्रकरणात एका आरोपीला पकडण्यात वन विभागाला यश आले मात्र दोन आरोपी अजूनही फरार आहेत वन्य प्राण्यांची शिकार करणे म्हणजे मोठे शौर्य नाही गुन्हा आहे अशी गंभीर प्रकारचे गुन्हे करून फरार आरोपींना वन विभाग का आश्रय देत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे वाघाची शिकार करणे किंवा त्याचे अवयव विकणे हा एक गंभीर गुन्हा आहे

अविनाश भारत सोयाम (३४) रा. महालगाव (खुर्द) ता. वरोरा जि. चंद्रपूर , असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र या आरोपी सोबत वाघाचे तुकडे करण्यासाठी मदत करणारे दोन आरोपींना पकडण्यात वन विभाग अजूनही असमर्थ आहे समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव झुडपी जंगलात तब्बल चौदा तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह आढळला. होता यामुळे वर्ध्याचा वनविभागही ॲक्शन मोडवर आला होता . वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपी म्हणून अविनाश सोयाम याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने वनविभागाला गुन्ह्याची कबुली दिली व इतर दोन इसमांचे नाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते पण वन विभागाचे अधिकाऱ्यांनी ही माहिती मीडियाला दिल्ली नाही वन विभागाचे अधिकारी त्या दोन आरोपींना का आश्रय देतात हा प्रश्न निर्माण होत आहे या प्रकरणाला तीन महिने लोटून सुद्धा आरोपींचा शोध वन विभाग का घेत नाही आहे त्याच्या मागील काय कारण आहे असा जवाब

अधिकाऱ्यांना विचारला जात आहे या प्रकरणात वन विभाग सुस्त कारवाई करत आहे असा आरोप केला जात आहे. या दोन आरोपींना पकडण्यात वन विभागाला अयश येत आहे

Updated : 25 Nov 2022 11:14 AM GMT
Next Story
Share it
Top