Home > Maharashtra news > माजी सैनिकास अपमानित करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई करा

माजी सैनिकास अपमानित करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई करा

जय जवान माजी सैनिक असोसिएशनचे, उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत निवेदन

माजी सैनिकास अपमानित करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई करा
X

माजी सैनिकास अपमानित करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई करा


जय जवान माजी सैनिक असोसिएशनचे, उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत निवेदन

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

माजी सैनिकास अपमानास्पद वागणूक देऊन अपमान करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संजय मारतोडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या करिता जय जवान माजी सैनिक असोसिएशन पुसदच्या वतीने पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांना, उपविभागीय अधिकारी पुसद तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुसद यांचेमार्फत तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे.


सविस्तर वृत्त असे की जय जवान माजी सैनिक असोशियन चे अध्यक्ष प्रकाश भोसले यांना त्यांचे राहते गावी भोजला येथे दिनांक 18 मे 2023 रोजी ग्रामपंचायत पोटनिवडणूक दरम्यान मतदान करण्यासाठी गेलेल्या प्रकाश भोसले यांना पोलीस उपनिरीक्षक संजय मारतोंडकर कार्यरत वसंत नगर पोलीस स्टेशन पुसद, यांनी विनाकारण दमदाटी करून दन्डाला पकडून जबरदस्तीने पोलिसांच्या गाडीमध्ये बसउन वसंत नगर पोलीस स्टेशन पुसद येथे जबरदस्तीने आणण्यात आले.


व त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्यामुळे पुसद येथील

संपूर्ण माजी सैनिक संघ यांनी तीव्र शब्दात पोलीस उपनिरीक्षक निषेध जाहीर निषेध करण्यात आला आहे अशाप्रकारे एका माजी सैनिकाला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे जय जवान माजी सैनिक असोसिएशन पुसद्च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,पोलीस आयुक्त अमरावती परिक्षेत्र, जिल्हा सैनिक बोर्ड यवतमाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी पुसद, पोलीस निरीक्षक वसंत नगर पोलीस स्टेशन पुसद यांना निवेदन देऊन अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संजय मारतोडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


यावेळी माजी सैनिक व जय जवान माजी सैनिक असोसिएशनचे पुसद चे अध्यक्ष प्रकाश भोसले, उपाध्यक्ष आलमगीर खान, मेजर भारत कांबळे, राजेंद्र पुरी भारत गरड,सुनील पांडे, इत्यादी सह अनेक माजी सैनिक व त्यांच्या वीर पत्नी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.Updated : 25 May 2023 7:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top