Home > Maharashtra news > वरळी मटका घरात सुरू असल्याचा संशय घेऊन, समाज रक्षण करणाऱ्याकडूनच महिलेचा विनयभंग.!

वरळी मटका घरात सुरू असल्याचा संशय घेऊन, समाज रक्षण करणाऱ्याकडूनच महिलेचा विनयभंग.!

Suspecting that Worli Matka was going on in the house, the woman was molested by the social security guard.

वरळी मटका घरात सुरू असल्याचा संशय घेऊन, समाज रक्षण करणाऱ्याकडूनच महिलेचा विनयभंग.!
X

वरळी मटका घरात सुरू असल्याचा संशय घेऊन, समाज रक्षण करणाऱ्याकडूनच महिलेचा विनयभंग.!


राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

"संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबनाची कार्यवाही करा.

तक्रार करते फिर्यादी पीडित कुटुंबाची प्रवीण नाचणकर ठाणेदार वसंत पोलीस स्टेशन पुसद यांच्याकडे मागणी".

पुसद शहरातील वसंतनगर मध्ये वरळी मटका सुरू असल्याच्या संशयावरून घरात काम करत असल्यालेल्या महिलेची महिला पोलिसामार्फत चौकशी न करता किंवा महिला पोलीस मार्फत झाडाझडती न घेता स्वतः महिलेची झाडाझडती घेऊन महिलेचा विनयभंग केल्याची घटना वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली.डीवायएसपी कार्यातील कर्मचारी भास्कर मदने,कुणाल रुडे,स्वप्नील मदने,व जुनेद अली करामत अली यांनी बेकायदेशीरपणे घरात घुसुन विनयभंग केला.हा प्रसंग सुरू असताना वसंतनगर मधील महिलांनी पोलिसांचा विरोध केल्याने तिथून निघून गेले.परंतु नंतर पुन्हा चौकशी च्या निमित्ताने येऊन खोट्या गुन्हात अडकून तुम्हाला जेल मध्ये टाकेल अशी धमकी देऊन तुमचे घर जेसीपी ने पाडून टाकू अशी धमकी दिल्याने त्या कुंटुबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.अश्या आशयाची या चार कर्मचार्यावर पोलीस स्टेशन वसंतनगर येथे फिर्याद दिली

असुन अजून सुद्धा या मानसीक विकृती असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.सामान्य नागरिकांवर तुम्ही गुन्हे दाखल करून कडक कारवाई करता पण तुमचेच कर्मचारी असले की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करता एका साठी वेगळा न्याय दुसऱ्यासाठी वेगळा का अशी नागरिकामध्ये चर्चा असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.यावर जिल्हा पोलिस अधीक्षक,जिल्हाधिकारी साहेब,लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक साहेब,यांनी यावर लक्ष घालून महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

Updated : 25 May 2023 8:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top