Home > Maharashtra news > दारव्हा येथे जश्ने उर्दु ऑल इंडिया उर्दू मुशायरा चे सफल आयोजन

दारव्हा येथे जश्ने उर्दु ऑल इंडिया उर्दू मुशायरा चे सफल आयोजन

( अखिल भारतीय उर्दु कवि सम्मेलन )

दारव्हा येथे जश्ने उर्दु ऑल इंडिया उर्दू मुशायरा चे सफल आयोजन
X

महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमी अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई तथा अल अमीन मुस्लीम वेलफेअर एज्युकेशन सोसायटी, दारव्हा यांचे संयुक्त विद्यमाने दारव्हा येथे दिनांक ११ मार्च २०२३, शनिवार रोजी सांयकाळी ६.०० वाजता स्थळ : निधी मंगल कार्यालय पंटागन गोलीबार चौक, दारव्हा येथे जश्ने उर्दु ऑल इंडिया उर्दू मुशायरा चे आयोजन (अखिल भारतीय उर्दु कवि सम्मेलन) करण्यात आले. सदरहु कार्यक्रमाकरीता उद्घाटक (शमाफिरोजा) तथा प्रमुख पाहुणे म्हणुन मा.ना. श्री. संयजभाऊ राठोड, मंत्री अन्न व औषध प्रशासन तथा पालक मंत्री यवतमाळ वाशिम जिल्हा, तसेच मान्वयवर म्हणुन मा. काजी आरिफउल्ला कुदरतउल्ला सदस्य महाराष्ट्र राज्य हज समिती, मुंबई, मा. श्री. धिरजकुमार गोहाड, प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद, दारव्हा, मा. परवेज सिद्दीकी, संस्थापक सदस्य विदर्भ मुस्लिम इंटलएक्च्युअल फोरम नागपुर, मा. श्री. श्रीधर मोहोड, माजी शिक्षण आरोग्य सभापती जि. प. यवतमाळ, मा. श्री. नामदेवराव खोब्रागडे, माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती, यवतमाळ, मा. बासिद मोहम्मद खान, माजी सभापती आरोग्य समिती, न.प. दारव्हा कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. आमीर आरिफ काजी, अध्यक्ष अल अमीन मुस्लिम वेलफेअर एज्युकेशन सोसायटी दारव्हा यांनी आपली उपस्थिती दर्शविली व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. मा. परवेज सिद्दीकी, संस्थापक सदस्य विदर्भ मुस्लिम इंटलएक्च्युअल फोरम नागपुर यांनी भुषविले. सदर मुशायरा करीता भारतातील नामवंत शायर : कुंवर जावेद, कोटा राजस्थान, हाशिम फिरोजाबादी, फिरोजाबाद यु. पी., हामीद भुसावली, भुसावल, डॉ. जिया टोंकी, टोंक राजस्थान, आरीफ सैफी, हैदराबाद, डॉ. खालीद नैय्यर, अमरावती, वासिफ यार, बुऱ्हाणपुर / मुंबई, सरिता सरोज, गोदिया, इरशाद अंजुम मालेगांव, मुजावर मालेगांवी, मालेगांव, साबीर बदनेरवी, बडनेरा, डॉ. जाहीद नैय्यर, अमरावती, सलीम चौहान, दिग्रस, हबीब मंजर, यावल, रिजवान हकीमी, जबलपुर एम.पी., फारूक जिया, आर्वी, मोहसिन कमाल, दारव्हा, जफर शाद, कलगांव व ईतर यांनी आपल्या कवितेतुन व शायरीतुन श्रोतांची मने जिकंली.


सदर मुशायरा कार्यक्रमात श्री. हाशिम फिरोजाबादी यांनी देशभक्ती तथा हिन्दु मुस्लिम एकतेवर ज्या शायरी केल्या त्यावर संपूर्ण श्रोतेगणांनी उठून त्यांचे टाळ्यांनी स्वागत केले. तसेच हैदराबादचे शायर व इस्टाग्रामवर फेमस असलेले श्री. आरिफ सैफी हैदराबादी यांनी युवांचे मने जिकंली, व त्याकरीता युवांलोकांनी त्यांचे सोबत सेल्फी काढण्याकरीता प्रचंड गर्दी केली होती. अकोला येथील साहित्यकार श्री. शकील एजाज यांचे उर्दू साहित्यामध्ये त्यांचे योगदानाकरीता फकरेबरार हे मानचिन्ह देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाकरीता प्रा. डॉ. आमीर आरिफ काजी आणी काजी अनिक आरिफ काजी यांनी तसेच त्यांचे सहकारी यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. सदर कार्यक्रमाकरीता दारव्हा तालुक्यातील इतर शायरी / कविता प्रेमी यांनी प्रचंड प्रमाणात हजेरी लावली होती.

Updated : 18 March 2023 5:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top