Latest News
Home > Maharashtra news > जागतिक योग दिनानिमित्ताने वाशिम पोलीस दलातर्फे आयोजित 'योग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक योग दिनानिमित्ताने वाशिम पोलीस दलातर्फे आयोजित 'योग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to 'Yoga Camp' organized by Washim Police Force on the occasion of World Yoga Day

जागतिक योग दिनानिमित्ताने वाशिम पोलीस दलातर्फे आयोजित योग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
X

जागतिक योग दिनानिमित्ताने वाशिम पोलीस दलातर्फे आयोजित 'योग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

फुलचंद भगत

वाशिम:-'समत्व योग उच्यते !' याचा अर्थ असा कि 'मनाचा समभाव हाच खरा योग आहे. दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जगभर उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक योग दिनाची थीम हि 'Yoga for Humanity' म्हणजे माणुसकीसाठी योग अशी आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरास विद्यार्थी व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दि.२१.०६.२०२२ रोजी सकाळी ०७.०० ते ०८.०० वाजतादरम्यान जुने पोलीस मुख्यालय, वाशिम येथे आयोजित शिबिरासाठी स्थानिक बाकलीवाल महाविद्यालयाच्या NCC पथकातील विद्यार्थ्यांसह जवळपास १५० विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. सदर शिबिरास अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS), सहा.पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनीलकुमार पुजारी यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला होता. सदर शिबिरामध्ये सपोउपनि. विजय चव्हाण व मपोना. संगीता ढोले यांनी विविध योगासनांचे प्रशिक्षण दिले व प्रात्याक्षिके करून घेतली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांनी 'ताणतणाव दूर करण्यासाठी व निरोगी तसेच सुखमय आयुष्य जगण्यासाठी योगाचा अंगीकार करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.सदर शिबीर हे मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे (IPS) यांच्या नेतृत्वाखाली परिविक्षाधीन सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS), उपविपोअ.श्री.सुनीलकुमार पुजारी, रा.पो.नि. श्री. मांगीलाल पवार, पोलीस मुख्यालय,वाशिम यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी रापोउपनि श्री. राठोड, पोलीस मुख्यालय वाशीम, सर्व कवायत निर्देशक व पोलीस अधिकारी व अंमलदार आदींनी मेहनत घेतली.

Updated : 22 Jun 2022 8:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top