Home > Maharashtra news > उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

Sooner or later, Maharashtra got a new cabinet. Now they should solve the problems of the state

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 18 जणांना मंत्रिपदाची शपथ‼️ कोणाला संधी❓

म मराठी❗लेटेस्ट अपडेट

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडाळ विस्तार अखेर आज राजभवनात पार पडला. यावेळी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला शिंदे गटातील व भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.!!

🔰 दरम्यान भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही.

शिंदे गटातून शंभूराज देसाई, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संदीपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

भाजपकडून गिरीश महाजन, विजयकुमार गावित, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, सुरेश खाडे आणि रविंद्र चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं आहे. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा आहे. ज्यांना क्लीनचीट मिळालेली नाही त्यांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं.

Updated : 9 Aug 2022 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top