Home > Maharashtra news > किरण मेडिकल जीवनदान ट्रस्टच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण वानखडे यांचा सत्कार .

किरण मेडिकल जीवनदान ट्रस्टच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण वानखडे यांचा सत्कार .

Social activist Laxman Wankhade was felicitated on behalf of Kiran Medical Jeevandan Trust.

किरण मेडिकल जीवनदान ट्रस्टच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण वानखडे यांचा सत्कार .
X

प्रतिनिधी नेर तालुका प्रतिनिधी

दिनांक १७ मार्च २०२३ रोजी उडपी हाँटेल वसई जिल्हा पालघर येथे लक्ष्मण वानखडे अध्यक्ष समता बहुउद्देशीय संस्था नेर, पत्रकार, तथा सामाजिक कार्यकर्ते यांचा किरण मेडिकल जीवनदान ट्रस्टचे अध्यक्ष अमर जगताप साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

समाजकार्याची भान ठेवून सतत समाजात समाज कार्य करणाऱ्या लक्ष्मण वानखडे अध्यक्ष समता बहुउद्देशीय संस्था नेर , पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या कार्याची दखल घेत अमर जगताप अध्यक्ष किरण मेडिकल जिवनदान ट्रस्टच्या वतीने उडपी हाँटेल वसई येथे सत्कार करण्यात आला त्यावेळी सूर्याभाऊ गवई वसई विरार महानगरपालिका सचिव वंचित बहुजन आघाडी , राजू वटार अध्यक्ष वसई शहर वंचित बहुजन आघाडी , अंकुश रामटेके पत्रकार, सिद्धार्थजी गेडाम, अक्षय गुजर, नवल सिरसाठ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


सामाजिक कार्यात सतत धडपडणारे तसेच शेतकरी व गोरगरीब जनतेसाठी न्याय हक्काची बाजू ठामपणे मांडणारे सामाजिक जाणीवेची जपणूक त्यांच्या मनामध्ये सतत घर करून उभी राहते असे प्रतिपादन या सत्कार समारंभाच्या मनोगता वेळी किरण मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमर जगताप यांनी व्यक्त केले .सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण वानखडे यांचा सामाजिक कार्याचा अभिमान बाळगून आम्हा सर्व लोकांना अभिमान वाटतो याचाच एक भाग म्हणून आज दिनांक १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल उडपी वसई येथे सत्कार आयोजन करण्याचे ठरविले असे प्रतिपादन सूर्याभाऊ गवई वसई विरार महानगरपालिका सचिव वंचित बहुजन आघाडी यांनी व्यक्त केले .तसेच याप्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण वानखडे यांचा गुण गौरव करून शिवाजी महाराजांची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना सामाजिक कार्याबद्दल पुढील वाटचाल करीता किरण मेडिकल जीवनदान ट्रस्टचे संस्थापक मा. किरण अमर जगताप मॅडम तसेच अध्यक्ष अमर जगताप साहेब यांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी किरण मेडिकल जिवनदान ट्रस्टचे पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 18 March 2023 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top