पुसद, पोफाळी परिसराला अवकाळी पावसासह गारांचा तडाका
चक्क आकाशातून पडल्या लिंबाच्या आकाराच्या गारा
X
राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
पुसद उमरखेड तालुक्यासह् पोफाळी परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला
सुमारे एक ते दीड तास विजेच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पावसाने थैमान मांडले
पुसद परिसरात संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अवकाळी पावसाला सुरुवात झाली,बोरगडी लक्ष्मी नगर,, कोपरा फाटा शेलु या भागात अवकाळी पावसाचा गारा पडल्या.
तसेच उमरखेडच्या पोफळीचा संपूर्ण परिसरात गारपिटीमुळे चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळालेया गारपिट मुळे गहू हरभरा व ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले, आधीच डबकाईस आलेला शेतकरी निसर्ग कोपल्याने अवकाळी पाऊस व आज पडलेल्या गारपिट मुळे शेतकऱ्याचे कंबर्डे मोडले.
पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना आजही नुकसान भरपाई मिळाली नसून, आज झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे
या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाची आलेला घास निसर्ग कोपल्याने तोही हिरावून घेतला आहे.
आता शासन मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार की शेतकऱ्यांना नुसते आशेवरच पुढील पेरणी हंगाम येईपर्यंत आपले आर्थिक नुकसान सोसावे लागेल हे मात्र येणारा काळच ठरवेल.