Home > Maharashtra news > माजी' मुख्यमंत्र्यांच्या गावी चिखलमय रस्ते व रस्त्याची दयनीय अवस्था

माजी' मुख्यमंत्र्यांच्या गावी चिखलमय रस्ते व रस्त्याची दयनीय अवस्था

सरिता जाधव यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेतलीच नाही

माजी मुख्यमंत्र्यांच्या गावी चिखलमय रस्ते व रस्त्याची दयनीय अवस्था
X

माजी' मुख्यमंत्र्यांच्या गावी चिखलमय रस्ते व रस्त्याची दयनीय अवस्था

सरिता जाधव यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेतलीच नाही

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी


यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मौजा चोढी, कारोळ गहूली हे गाव पुसद तालुक्यातील शेवटच्या टोकावर व वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे यातील गहूली या गावाने महाराष्ट्राचे नेतृत्व केलेले आहे. या गावाने महाराष्ट्राला दोन दोन मुख्यमंत्री दिलेत सर्वाधिक मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ असलेले वसंतराव नाईक व स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचे हे जन्मगाव आहे.


परंतु आज त्याच कर्तुत्वान मुख्यमंत्र्यांच्या जन्मगावी जायला धड रस्तेही नाहीत ही मात्र शोकांतिकाच म्हणावी लागेल, पावसाळ्याची सुरुवात झाल्याने मौजा चोढी ता.पुसद ते गहुली कारोळ रस्ता जिव घेना झाला आहे.


सर्वत्र रस्ते चिखलमय झाल्याने या रस्त्यावरून जाताना समस्त नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो, दुचाकीस्वार, सायकल, रिक्षा, बैलगाडी,शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, इत्यादी ना फार कसरत करत हा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे या सर्कलच्या माजी पंचायत समिती सदस्य, सरिता रुपेश जाधव यांनी अनेक वेळा रस्त्याची दुरुस्ती ,डागडुजी, अरुंद रस्ते रुंद करून रस्त्यावरील पुलाच्या संबंधित विषयाच्या अनुषंगाने, पंचायत समितीच्या मासिक सभेत मध्ये विषय घेऊन तसेच बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली या याविषयी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, पावसाळा सुरू झाल्याने गावातील नागरिकांना याच रस्त्यावरून येजा करावी लागते हा रस्ता चिखलमय झाल्याने अनेक वाटसरूचे अपघात होत आहेत परंतु अधिकारी ऑफिस च्या बाहेर निघायला तयार नाहीत मागील पावसाळ्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने अनेक गावाला झोडपून पूरस्थिती निर्माण झाली होती व ग्रामीण भागातील रस्ते उघडून अनेक जण पुरात वाहून गेले होते मागील घटनेचा आढावा घेऊन संबंधित विभागाने या ग्रामीण भागाचा दौरा करून रस्ते पूल दुरुस्ती अग्रक्रमाने करून घेणे अत्यंत गरजेचे आहे पावसाळ्यात गावचा आणि शहराचा संपर्क तुटल्याने गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती व सुधारणा न झाल्यास ग्रामीण भागातील समस्त नागरिकांना घेऊन आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही व आंदोलन झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे मत, माजी पंचायत समिती सदस्य सरिता रुपेश जाधव,व विमुक्त जाती भटक्या जमाती चे जिल्हाध्यक्ष रुपेश जाधव गहूलीकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Updated : 22 Jun 2022 2:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top