Home > Maharashtra news > संविधान चौक तथागत नगर फलकाचा जातीय द्वेषातून विरोध!

संविधान चौक तथागत नगर फलकाचा जातीय द्वेषातून विरोध!

फलका समोर फलक, लावून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी!

संविधान चौक तथागत नगर फलकाचा जातीय द्वेषातून विरोध!
X

संविधान चौक तथागत नगर फलकाचा जातीय द्वेषातून विरोध!

फलका समोर फलक, लावून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी!

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

आज दिनांक 4 जुलै 2022 रोजी स्थानिक तथागत नगर येथील महिला व रहिवाशी नागरिक यांनी तथागत नगर येथील संविधान चौक फलका शेजारी इतर नावाचे फलक लावल्याने याठिकाणी जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या समाजकंटका विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता पुसद उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की दिनांक 28 जुलै 2022 रोजी जातीवादी मानसिकतेतून येथील समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण व्हावा या उद्देशाने जाणीवपूर्वक संविधान चौक तथागत नगर पुसद येथे लावलेल्या फलका समोरच इतर नावाचा फलक अर्थात शांतीनगर, जय श्रीराम, या नावाचे एक नाहीतर, पाच ते सहा फलक जाणीवपूर्वक या ठिकाणी लावले आहेत.

120 ते 130 घरांची संख्या असणार्‍या या नगर वस्तीमध्ये असे फलक लावून पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. असाच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार मागील दहा वर्षांपूर्वी झाला होता.

सन 2012 ,13 मध्ये नगर परिषदेतर्फे दलित वस्ती अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात आली होती परंतु येथील जातीवादाने हेतुपुरस्सर या ठिकाणी बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये या वास्तूचा वापर करण्यात येऊ नये म्हणून येथे जातीय मानसिकतेतून काचेच्या बाटल्या, व खिडकीच्या काचा फोडून विरोध केला होता व येथील वयोवृद्ध समाजबांधवांना धमक्या देत या प्रभागात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हा मागील झालेला प्रकार व संघर्ष पाहता येथील समाज बांधवांनी निमूटपणे सहन केला याचे कारण की येथील आंबेडकर अनुयायी हे बौद्ध धम्माचे पाईक असल्यामुळे शांतपणे सहन केले.

परंतु मागील काळात बोर्डाच्या वादातून झालेल्या अनेक सामाजिक एकोपा बिघडून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत.

त्यापैकी पुसद तालुक्यामध्ये शेंबाळ पिंपरी येथील जागेतील बोर्ड लावण्याच्या वादातून अतिसंवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती.

तसे प्रकार घडूच नये म्हणून शासकीय विश्रामग्रह समोरील संविधान चौक तथागत नगर या फलका शेजारी इतर नावाचा फलक लावल्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये व जातीय सलोखा टिकून राहावा यावा करीता या निवेदनाची दखल घेण्यात यावी तसेच येथील दहशत माजविणाऱ्या समाजकंटकांकडून बौध्द बांधवांना धोका असल्यामुळे सुरक्षा प्रदान करण्यात यावी व लावण्यात आलेली सहा फलके त्वरित काढण्यात यावी तसेच शासनातर्फे बांधण्यात आलेले येथील बुद्ध विहार ही वास्तु आम्हाला परत मिळवून देण्यात यावे अशा विविध मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांचेमार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी पुसद मुख्य अधिकारी न.प. पुसद, वसंतनगर पोलिस स्टेशन यांना देण्यात आले.

या निवेदनावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष,भीमराव कांबळे,प्रज्ञापर्व 22 चे अध्यक्ष विठ्ठल राव खडसे, सुखदेवराव भगत एडवोकेट विश्वास भवरे, सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार बाबाराव उबाळे, सोमेश्वर जाधव, भीम टायगर सेनेचे, किशोर दादा कांबळे, रिपाईचे लक्ष्मण कांबळे,, भिम आर्मीचे अशोक भालेराव, संगमित्रा कांनिंदे, कुसुम भगत जय शीला पठाडे तारा डोंगरे सुनीता भगत शोभा कांबळे साधना पाईकराव कल्पना सावळे विजया दुधाडे शोभा डोंगरदिवे , विद्या कांबळे जयश्री खिराडे, पत्रकार राजेश ढोले दिनेश खांडेकर, सोनू वराठी, हेमंत इंगोले, पत्रकार प्रकाश खंडागळे विजय निखाते, दत्तराव कांबळे, महेंद्र कांबळे, संदीप वाढवे विके कांबळे एसएम भगत विशाल डाके प्रतीक पठाडे स्वस्तिक पठाडे सुमित कांबळे प्रांजल इंगळे, विशाल खिल्लारे पंकज खिराडे,इत्यादी समाज बांधव यांच्या निवेदनावर सह्या असून निवेदन देतेवेळी प्रमुख कार्यकर्त्या सहित विविध संघटनाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असंख्य महिला व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.Updated : 4 July 2022 9:22 PM GMT
Tags:    
Next Story
आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच

आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच

मोदी हटाओ, देश बचाओ च्या ना-यांनी शिवनी दणाणले

मोदी हटाओ, देश बचाओ च्या ना-यांनी शिवनी दणाणले

परोपटे लेआउट मधील रस्त्याला आले तलावाचे स्वरूप

परोपटे लेआउट मधील रस्त्याला आले तलावाचे स्वरूप

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

काँग्रेसच्या वतीने शेलुबाजार ते मंगरुळपीर पर्यंत आझादी का गौरव पदयात्रा

काँग्रेसच्या वतीने शेलुबाजार ते मंगरुळपीर पर्यंत 'आझादी का गौरव पदयात्रा'

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

PDM पोटॅश मध्ये शेतकऱ्याची फसवणूक, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगती पथावर असलेल्या डी गँग ला अभय कोणाचे.

PDM पोटॅश मध्ये शेतकऱ्याची फसवणूक, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगती पथावर असलेल्या" डी" गँग ला अभय कोणाचे.

सौंदर्य स्पर्धेत डॉ. अंजली गवार्ले विजयी

सौंदर्य स्पर्धेत डॉ. अंजली गवार्ले विजयी

वाघाडी नदीच्या पुरात वाहून गेलेला ईसमाचा म्रुतदेह वाहत आला कोडंजई शिवारात

वाघाडी नदीच्या पुरात वाहून गेलेला ईसमाचा म्रुतदेह वाहत आला कोडंजई शिवारात

संजय राठोड यांची कॅबिनेट मंञी मंडळात वर्णी लागल्याने घाटंजी शहरात साजरा केला गेला जल्लोश

संजय राठोड यांची कॅबिनेट मंञी मंडळात वर्णी लागल्याने घाटंजी शहरात साजरा केला गेला जल्लोश

चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्‍हा सज्‍ज - माजी महापौर राखी कंचर्लावार    चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्‍यांनी केला जल्‍लोष साजरा.

चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्‍हा सज्‍ज - माजी महापौर राखी कंचर्लावार चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्‍यांनी केला जल्‍लोष साजरा.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

Share it
Top