नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
Narsi Chowk to Bus Stand Biloli Road area should be taken care of by private vehicles: Mustafa Patel Kunchelikar
X
नायगाव प्रतिनिधी
मागील 2 वर्षापासून कोरोना या महामारीच्या अनुषंगाने बंद असलेल्या शाळा या वर्षी मोठ्या उत्साहात चालू झाल्या त्यामुळे नरसी व बस स्थानक परिसरात विध्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात नेहमीच वर्दळ असते यामुळे नरसी चौक ते बसस्थानकचा परिसर बेशिस्त खाजगी वाहनामुळे विध्यार्थी व जनतेला याचा त्रास सोसावा लागत आहे.अनेक किरकोळ अपघात नेहमीच घडत असतात त्याकरिता दि,29/6/2022 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रामतीर्थ पोलीस स्टेशन यथे निवेदन देऊन बेशिस्त वाहानाचा बंदोबस्त करुन शालेय विध्यार्थी व नागरिकांना या समस्येपासून मुक्त करावे आशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे नायगाव विधानसभा अध्यक्ष मुस्तफा पटेल कुंचेलीकर तसेच सदाम पटेल नरसी सामाजिक कार्यकर्ते .बेग इरफान टिपू, शेख आहेमद,शेख जावेद पालेकर,शेख मुस्तफा नरसीकर यानी केली आहे