ईसापुर (धरण) ग्रामपंचायत ने साधला सर्वधर्मसमभाव विकास
3 कोटी 16 लाखाचे काम प्रगतीपथावर!
X
ईसापुर (धरण) ग्रामपंचायत ने साधला सर्वधर्मसमभाव विकास
3 कोटी 16 लाखाचे काम प्रगतीपथावर!
राजेश ढोले पुसद ता. प्रतिनिधी
यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले
शेंबाळपिंपरी मिनी बाजारपेठ असलेल्या गावापासून पासून 4की. मीं. अंतरावर असलेल्या इसापूर धरण येथील जुन्या जाणत्या व सध्याच्या तरुण गाव स्थरावरील नेतृत्वाने सर्वधर्म समभाव परंपरा कायम ठेवत गावाच्या विकास कामात सर्व धर्मांच्या लोकांना न्याय देण्याचे काम करीत गावात विकासाची गंगा आणत कोट्यावधीचें कामे करून गाव विकास साधला जातं आहे.
तसेंच काही कामे मंजूर सुद्धा असल्याने ग्रा. प. सरपंचासहित सर्व सहकारी ग्रा. प. सदस्य तसेंच गावातील जेष्ठ मार्गदर्शक व सक्षम नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच श्री.कैलास यशवंतराव नाईक हे गावकर्यांनी टाकलेली जबाबदारी सक्षमरित्या पार पाडीत आहेत.
त्यांनी आतापर्येन्त1कोटी 10लाखांची कामे पूर्ण केली आहेत. यामध्ये बौध्द विहार वाल कामपाउंड बांधकाम 13लाख, बौध्द सामाजिक सभागृह 1लाख, नवंबौध्द घटकांच्या वस्ती सिमेंट कॉक्रेट रस्ता 19लाख, नवंबौध्द वस्तीत पेवर ब्लॉक 5लाख, नवबौद घटक वस्तीमध्ये सौरदिवे 2:40लाख असे 40लाखाचे विकास कामे बौध्द सामाजांचे करण्यात आले आहे. तसेंच मुस्लिम समाजांसाठी कब्रस्थानचें वालकंपाउंड व टिनशेड 10लाख तसेंच कब्रस्थान परिसर मध्ये पेवर ब्लॉक 12:40असे 22लाख 40हजार आणि हिंदु समाजासाठी विठ्ठलरुख्मिणी मंदिर परिसर वाल कंपाऊंट व पेवर ब्लॉक 25लाख विठ्ठल रुख्मिणी मंदिर स्वछयालय बांधकाम 2लाख 70हजार व याच ठिकाणी 10लाखाचे वाल कंपाऊंट मंजूर काम असे 37लाख 70हजार तसेंच गावातील सर्व प्राथमिक शाळा,प्राथमिक उर्दूशाळा,अंगणवाडी,जिल्हा परिषद हायस्कुल पैंनगंगानगर या ठिकाणी वाल कंपाऊंड, पेवर ब्लॉक, टिनपत्रे बसविणे, गावातील सर्व वार्डातील बांधिस्त नाली बांधकाम, नळ योजनेसाठी पाईप लाईन टाकणे,गावातील सांडपाणी नाली सफाई असे ऐकून 1कोटी 90लाखाचे विकास कामे करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या नवीनजलजीवन योजने कायमस्वरूपी पिण्याचां पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी चालू काम 1कोटी 26लाख असे ऐकून 3कोटी 16लाखांचे विकास कामे सध्या परिस्थिती सरपंच उपसरपंच सचिव व सर्व सहकारी ग्रा.प.सदस्य तसेंच गावातील जेष्ठ मार्गदर्शक यांच्या अथांग परिश्रमाने व लोकनेते मां.मनोहरराव नाईक तसेंच पुसद विधानसभा क्षेत्राचे मां. आमदार श्री इंद्रणिल नाईक,विधानपरिषद सदस्य मां. निलय नाईक यांच्या स्थानिक विकास निधी व इतर निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे सर्व विकास कामे आम्ही करू शकलो असे मत सरपंच श्री कैलास नाईक यांनी व्यक्त केले आहे.