आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निर्देशाने धामणी येथे गारपीट ग्रस्त पिकांची पाहणी
Inspection of hail affected crops in Dhamani on the instructions of MLA Rajendra Patni
X
कारंजा: दिनांक 19 मार्च रोजी तालुक्यातील धामणी (खडी )येथे भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, नायब तहसीलदार हरणे, तालुका कृषी अधिकारी चौधरी यांनी येथे काल रात्री झालेल्या अवकाळी पाणी व गारपीट मुळे पिकांचे नुकसान झाल्याने या भागातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जावून पिकांची पाहणी केली. यावेळी येथील शेतकरी उपस्थीत होते. येथील पंचायत समिती सदस्य दिनेश वाडेकर यांनी तत्काळ भाजपा तालुका अध्यक्ष यांचेसी संपर्क केला तत्क्षणी भाजपा तालुका अध्यक्ष यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजेंद्र पाटणी साहेब यांच्यासी संपर्क केला असता त्यांनी तत्काळ या ठिकाणचे पिकांची पाहणी करण्याचे निर्देश अधिकारी यांना दिले. धामणी (खडी ) येथे गारपीट झाली . शेतातील कांद्याच्या पिकाचे, गहू, काही फळबागा, अन्य पिकं बाधीत झाली, पिकाचे नुकसान झाले असल्याचे काही शेतातील पाहणीत दिसले. भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे ,तहसीलदार हरणे , तालुका कृषी अधिकारी चौधरी , पं. स. सदस्य दिनेश वाडेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने, आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे, पटवारी निलेश ,मंडळ अधिकारी क्षीरसागर , कृषि अधिकारी जयस्वाल ,ग्रामविकास अधिकारी मिसाळ ,सरपंच नितेश चक्रे ,उपसरपंच गजानन दहापुते, वडगाव येथील गायकवाड , मुकेश महाजन,ग्रामपंचायत सदस्य गोपाल सुडके ,किशोर खोंड ,मंगेश नेतनकर, राहुल उजवणे ,महादेव पिंगणे, राजु खोंड, गणेश पवार,विपीन राठी ,मंगेश बोरकर, हेमंत ढोरे ,सूरज ढोरे इत्यादिसह गावकरी शेतकरी उपस्थित होते. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय ग्रामिण पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडाळे यांचेकडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमूख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.