पुसद येथे दोन दिवसीय समता सैनिक दल, निवासी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
Inauguration of two-day Samata Sainik Dal, Residential Training Camp at Pusad
X
राजेश ढोले पुसद तालुका प्रतिनिधी
"गावोगावी समता सैनिक दलाच्या शाखा निर्माण झाल्या पाहिजे..... जिल्हा अध्यक्ष रवी भगत यांचे प्रतिपादन"
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संरक्षण विभाग पुसद यांच्या वतीने महाड क्रांती दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पारमिता बुद्धविहार महावीरनगर येथे १९ मार्च ते २० मार्च या दोन दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रविजी भगत जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत कांबळे माजी सैनिक भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे म्हणून रुपेश वानखेडे सरचिटणीस यवतमाळ, राजेसाहेब पंडित उमरखेड, सिद्धार्थ गायकवाड दारव्हा तालुकाध्यक्ष, नागोराव बनसोड आर्णी तालुकाध्यक्ष, विनायक देवतळे दिग्रस तालुकाध्यक्ष, किशोर आळणे महागाव, बुद्धरत्न भालेराव वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष पुसद, राजेश ढोले पत्रकार ,मिलिंद बरडे मेजर,भगवान बरडे बौध्दाचार्य, सुखदेव भगत, मिलिंद जाधव, अशोक धुळे हे उपस्थित होते तर प्रशिक्षक म्हणून पोर्णिमा भोसले मेजर मुंबई, दर्शना टोणगे मेजर मुंबई, कोमल गरुड डिव्हिजन ऑफिसर मुंबई , अशोक पेरकावार मेजर चंद्रपूर हे उपस्थित होते.
या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
या शिबिरामध्ये १८५ महिला व पुरुष सैनिकांनी नोदणी केली आहे. उद्घाटनाच्या प्रसंगी रविजी भगत म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या शाखा गावोगावी स्थापन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोलानाथ कांबळे यांनी केले.सूत्रसंचालन ल.पु.कांबळे यांनी केले.तर आभार प्रल्हाद खडसे यांनी मानले.
या कार्यक्रमाला भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी मंडळी, व समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते.