दिग्रस शहरासह तालुक्यात गारपीट -
Hailstorm in taluk including Digras city
M Marathi News Network | 19 March 2023 6:09 AM GMT
X
X
दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी,बेलुरा,लाख,चिंचपात्र,व इतर गावात आज 18 मार्च रोजी सायंकाळी 5 चे दरम्यान सुसाट वारा,पाऊस व त्यासोबतच बोराच्या आकाराची दहा मिनिटं गार पडल्यामुळे शेतातील चना ,गहू,आंबे,या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतात गहू जमिनीवर झोपला आहे,हरभरा पिकांचे घाटे जमिनीवर सडा पडलेला दिसून येत आहे,खरिपात सोयाबीन,कापूस पीकांची नापिकी शेतकऱ्यांचे पदरात पडली असताना रब्बी पिकांचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे मागून पेरणी केलेली हरभरा,गहू पिके अजूनही शेतात उभे आहे,सोंगणीला सुरुवात होत असताना दिग्रस शहरा सह तालुक्यामध्ये गारपीट झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे,
अजित महिंद्रे दिग्रस
Updated : 19 March 2023 6:09 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire