"शासनाने अविलंब 'जुनी सेवा निवृत्ती वेतन' योजना लागू करावी. यासाठी मी आग्रही."- आ. अँड.किरणराव सरनाईक.
कर्मचार्याच्या जुनी निवृत्त योजनेच्या मागणीला आ. अँड. किरणराव सरनाईकांचा सक्रिय पाठिंबा !
X
वाशिम/कारंजा : महाराष्ट्र शासनाच्या जुलमी धोरणामुळे सर्वच विभागातील राज्यकर्मचारी आणि शिक्षकांचा भविष्यातील वृद्धापकाळ अंध:कारमय होणार असल्याचे कटूसत्य दिसून येत असल्याने, गेल्या जवळ जवळ सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील सर्वच शासकिय राज्यकर्मचारी आणि शिक्षक एकवटले असून, त्यांनी गेल्या दि.१४ मार्च पासून, "एकच मिशन जुनी पेन्शन'' ही सरकारला आर्त हाक देत बेमुदत संपाचा मार्ग अवलंबलेला आहे. त्यानुसार जवळ जवळ १००% राज्यकर्मचारी संपात सहभागी झाल्याचे दिसून येत असून, कर्मचाऱ्याच्या या 'न भुतो न भविष्यती' अशा एकत्रीत संपामुळे, सद्यातरी सरकारी कार्यालये ओस पडल्याचेच दिसून येत असून,भविष्यातील चिंतेमुळे प्रत्येक जिल्हा-तालुका स्तरावर राज्यव्यापी कर्मचारी त्यांच्या मुलाबाळांसह निदर्शने,मोर्चे,धरणआंदोलन सुद्धा करीत आहेत. वाशिम जिल्हयातील वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक तालुका स्तरावरील तहसिल कचेरीसमोर कर्मचारी निदर्शने करीत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी जिल्हयात व तालुक्यात कर्मचारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्याचे विराट मोर्चे निघालेत. विशेष करून या मोर्चाला अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे लोकप्रिय शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांनी भेट देवून या आंदोलनाला त्यांचा सक्रिय पाठींबा जाहिर केला. यावेळी राज्यकर्मचारी तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलतांना त्यांनी स्पष्टपणे सांगीतले की,मी आधी पासूनच महाराष्ट्र राज्यातील,दि १ नोहेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त झालेल्या प्रत्येक राज्य कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी सेवा निवृत्ती (पेन्शन) योजना मिळावी. या मागणीवर ठाम असून, मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना वेळोवेळी जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केलेली होती. मी आझाद मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लगेच सभागृहामध्ये दि १५ डिसेंबर २०२० रोजी जुन्या पेन्शन बाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. शिवाय सलग सतरा ते अठरा वर्षांपासून विनाअनुदान तत्वावर बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन देण्याबाबत सुचवीले होते. त्यावेळी माझी मागणी अंशतः पूर्ण होऊन शिक्षकांकरीता २०% अनुदान मंजूर करण्यात आलेले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून मी २०% अनुदानाची दुप्पटीने पूर्तता करून ४०% करण्याची विनंती केली आहे. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दि २७ डिसेंबर रोजी,राज्य कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मागणी करीता,विधान भवनावर मोर्चा निघाला होता योगायोगाने त्याच दिवशी,शिक्षक व राज्य कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणी साठी माझा तारांकित प्रश्न पटलावर लागलेला असतांना मी विधानपरिषदेच्या सभागृहात जुन्या पेन्शनची माझी मागणी मी रेटून धरलेली होती. सध्या महाराष्ट्रात जुन्या पेन्शन करीता जो राज्यव्यापी संप सुरू आहे. या संपाला माझा सक्रिय पाठींबा मी जाहिर करीत असून मी सदैव शिक्षक व कर्मचारी यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे. असे अमरावती विभागाचे शिक्षक आमदार आ.अँड किरणराव सरनाईक यांनी ठामपणे जाहिर केले असल्याचे वृत्त डॉ.के.बी. देशमुख यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मुलाखती दरम्यान सांगीतले आहे.