Home > Maharashtra news > अंगणवाडी भरती प्रक्रियेत विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत कुमारिकांना प्राधान्य द्या!

अंगणवाडी भरती प्रक्रियेत विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत कुमारिकांना प्राधान्य द्या!

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात न. प. प्रशासनास निवेदन

अंगणवाडी भरती प्रक्रियेत विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत कुमारिकांना प्राधान्य द्या!
X

अंगणवाडी भरती प्रक्रियेत विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत कुमारिकांना प्राधान्य द्या!

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात न. प. प्रशासनास निवेदन

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

पुसद नगर परिषद अंतर्गत, अंगणवाडी भरती प्रक्रिया टेंडर निघाले असून,उपलब्ध असलेल्या जागेपेक्षा हजारो महिलांनी या जागेसाठी अर्ज भरले आहेत, दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून अपेक्षित असलेल्या जागेपेक्षा शंभर पटीने अर्ज भरतीसाठी येतात परंतु पुसद शहरातील झोपडपट्टी,कामगार वस्तीतील अनेक महिला, मुली, शिक्षण घेऊन नोकरीपासून वंचित आहेत बेरोजगार आहेत, त्याना या निघालेल्या भरती मध्ये, मागासवर्गीयांसाठी जातीची अट शिथिल करून प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून, या स्लम एरिया मधील घटस्फोटीत , परितक्त्या, विधवा अशांना नोकरी मिळाल्यास त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल व त्यांच्या जीवनाचा गाडा चालेल.


या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला घेऊन बहुजन वंचित आघाडी पुसद शहराच्या वतीने शहराध्यक्ष जयानंद उबाळे, यांच्या नेतृत्वात न.प.चे प्रशासकीय अधिकारी मुख्य अधिकारी मा. किरण सुक्कलवाड साहेब यांना प्राधान्याने, नमूद केलेल्या वंचितांना प्राधान्याने अंगणवाडी भरती मध्ये प्राधान्य देण्यात यावे करिता निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी, बहुजन वंचित आघाडीचे शहर उपाध्यक्ष दयानंद उबाळे,तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, राजू टाळीकोटे , प्रकाश किल्लारे, प्रणव भागवत, शंकर कर्मंनकर, प्रसाद खंदारे, स्वप्निल पाईकराव, शेख मोहसीन, इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Updated : 23 Jun 2022 5:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top