Home > Maharashtra news > *माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेशाचे वाटेवर....* *काँग्रेसला केला राम राम*

*माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेशाचे वाटेवर....* *काँग्रेसला केला राम राम*

*Former state minister Ashok Shinde on the way to join Shiv Sena's Shinde group....* *Ram Ram to Congress*

*माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेशाचे वाटेवर....*    *काँग्रेसला केला राम राम*
X

*माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेशाचे वाटेवर....*

*काँग्रेसला केला राम राम*

संपादक. इकबाल पहेलवान वर्धा जिल्हा.


हिंगणघाट दि.२३ मार्च

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसनेते तथा माजी आमदार अशोक शिंदे यांनी आज काँग्रेसला राम राम केला.

वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आज ही घोषणा केली.

काही काळापुर्वी पक्षा अंतर्गत कलहामुळे शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता परंतु काँग्रेसमध्येसुद्धा आता गळ चेपी करण्यात आली, जवळपास दिड वर्षापासून त्यांना काँग्रेस पक्षाने कुठलीही मोठी जबाबदारी न दिल्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज होते.

आता ते ना.एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा संपुर्ण जिल्हयातील राजकीय वर्तुळात आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यानंतर दरम्यानचे काळात शिंदे गटाच्या अनेक बड्या नेत्यांकडून शिंदे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नुकत्याच गेल्या दिवाळीदरम्यान राज्याचे मंत्री ना.संजय राठोड यांनी अचानक अशोक शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मन वळविण्याचा प्रयत्न केला होता.

पंरतु आता माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हे ना.शिंदे गटात घेतील प्रवेश घेतील की फक्त हि राजकीय चर्चाच ठरणार हे अजुनही अनुत्तरीत आहे.

Updated : 23 March 2023 8:40 AM GMT
Next Story
Share it
Top