Home > Maharashtra news > महादिप परीक्षेत यश प्राप्त करून दिल्ली दौऱ्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार

महादिप परीक्षेत यश प्राप्त करून दिल्ली दौऱ्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार

felicitation of the female students who qualified for the Delhi tour after achieving success in the Mahadeep examination

महादिप परीक्षेत यश प्राप्त करून दिल्ली दौऱ्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार
X

राजेश ढोले पुसद तालुका प्रतिनिधी

महादिप परीक्षेत उमरखेड तालुक्यातील बिटरगाव(खु) येथील विद्यार्थिनी कु.वेदिका नरवाडे, अवंतिका लव्हांडे व मार्लेगाव येथील विद्यार्थिनी कु.कोमल कदम यांनी नेत्रदीपक यश प्राप्त करीत दिल्ली दौऱ्यासाठी पात्र ठरल्या असल्याने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.त्यांच्या यशाबद्दल माजी सभापती तथा जिजाऊ अर्बन बँकेच्या संचालिका सौ.सविताताई चितांगराव कदम यांनी शाळेत व या विद्यार्थिनींच्या घरी जावुन त्यांचा ओढणी, परीक्षा पॅड, पेन,गुलाब व मिठाई देवुन सत्कार करून त्यांचे कौतुक करीत त्यांच्या दिल्ली दौऱ्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिजाऊ अर्बन बँकेचे संचालक प्रकाशराव नरवाडे ,सहाय्यक शिक्षक फड सर,गायकवाड सर,जाधव मॅडम,विद्यार्थिनींचे आई वडील उपस्थित होते.

Updated : 19 March 2023 5:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top