Home > Maharashtra news > ब्रेक निकामी झाल्याने लिंबी जवळील घाट वळण रस्त्यात ट्रकचा भीषण अपघात

ब्रेक निकामी झाल्याने लिंबी जवळील घाट वळण रस्त्यात ट्रकचा भीषण अपघात

ट्रक चालक मालक यांचा जागीच मृत्यू

ब्रेक निकामी झाल्याने लिंबी जवळील घाट वळण रस्त्यात ट्रकचा भीषण अपघात
X

ब्रेक निकामी झाल्याने लिंबी जवळील घाट वळण रस्त्यात ट्रकचा भीषण अपघात

ट्रक चालक मालक यांचा जागीच मृत्यू

राजेश ढोले/ पुसद प्रतिनिधी

पुसद शहरापासून जवळच असलेल्या लिंबी गावा जवळील पुसद कडे येणाऱ्या टर्निंग पॉईंट जवळ आज दि.२३ मे २०२३ रोजीच्या सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान १४ चाकी ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला आहे.अपघातात ट्रकचा चालक-मालक जागी ठार झाला असून क्लिनर मात्र किरकोळ जखमी झाला आहे.अपघातामुळे काही वेळेसाठी वाहतूक खोळंबली होती.

मलकापूर येथे राहणाऱा मजीद शेख रफीक वय २७ वर्षे या चालक मालकाचा मृत्यू झाला आहे.तर त्याचाच भाऊ व क्लिनर शेख अफजल शेख रफिक वय २५ अपघातामध्ये जखमी झाला आहे.


प्राप्त माहितीनुसार शेख मजीद व त्याचा भाऊ शेख अफजल हे दोघेजण वाशिम मार्गे खंडाळा घाटातून पुसद येथे टिन पत्रे १४ चाकी ट्रक क्रमांक एमएच १८,बीए ०६११ मध्ये घेऊन येत होते अशावेळी उतार वळण असणाऱ्या निंबी टर्निंग पॉईंट जवळ ब्रेक निकामी झाले व् अशातच वाहनावरील संतुलन बिघडल्याने शेख मजीद यांनी ट्रकमधून उडी टाकून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला असता नियंत्रण सुटल्याने त्याच्याच ट्रक खाली दबून व नंतर गुदमरून मृत्यू झाला आहे.तर त्याचा भाऊ किरकोळ जखमी झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अपघात झालेल्या ठिकाणी एकच गर्दी केली होती.

त्यानंतर वसंत नगर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच् वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चव्हाण,संतोष चव्हाण,संजय पवार,रतीश वानखेडे,सतीश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रस्त्यावर पडलेल्या ट्रकला क्रेनच्या साह्याने काढण्याची प्रक्रिया सुरू होती. वृत्तलिही पर्यंत मृतकाला पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले असून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Updated : 27 May 2023 4:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top