Home > Maharashtra news > एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..

Eknath Shinde is the big announcement of the Chief Minister, Devendra Fadnavis.

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..
X

म मराठी न्यूज नेटवर्क

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील."

देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, "गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला. या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाही. शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली."

Updated : 2022-06-30T17:36:02+05:30
Tags:    
Next Story
आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच

आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच

मोदी हटाओ, देश बचाओ च्या ना-यांनी शिवनी दणाणले

मोदी हटाओ, देश बचाओ च्या ना-यांनी शिवनी दणाणले

परोपटे लेआउट मधील रस्त्याला आले तलावाचे स्वरूप

परोपटे लेआउट मधील रस्त्याला आले तलावाचे स्वरूप

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला

काँग्रेसच्या वतीने शेलुबाजार ते मंगरुळपीर पर्यंत आझादी का गौरव पदयात्रा

काँग्रेसच्या वतीने शेलुबाजार ते मंगरुळपीर पर्यंत 'आझादी का गौरव पदयात्रा'

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत

PDM पोटॅश मध्ये शेतकऱ्याची फसवणूक, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगती पथावर असलेल्या डी गँग ला अभय कोणाचे.

PDM पोटॅश मध्ये शेतकऱ्याची फसवणूक, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगती पथावर असलेल्या" डी" गँग ला अभय कोणाचे.

सौंदर्य स्पर्धेत डॉ. अंजली गवार्ले विजयी

सौंदर्य स्पर्धेत डॉ. अंजली गवार्ले विजयी

वाघाडी नदीच्या पुरात वाहून गेलेला ईसमाचा म्रुतदेह वाहत आला कोडंजई शिवारात

वाघाडी नदीच्या पुरात वाहून गेलेला ईसमाचा म्रुतदेह वाहत आला कोडंजई शिवारात

संजय राठोड यांची कॅबिनेट मंञी मंडळात वर्णी लागल्याने घाटंजी शहरात साजरा केला गेला जल्लोश

संजय राठोड यांची कॅबिनेट मंञी मंडळात वर्णी लागल्याने घाटंजी शहरात साजरा केला गेला जल्लोश

चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्‍हा सज्‍ज - माजी महापौर राखी कंचर्लावार    चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्‍यांनी केला जल्‍लोष साजरा.

चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्‍हा सज्‍ज - माजी महापौर राखी कंचर्लावार चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्‍यांनी केला जल्‍लोष साजरा.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

Share it
Top