Home > Maharashtra news > डॉ. सुरेशचंद्र ललवानी यांचे निधन

डॉ. सुरेशचंद्र ललवानी यांचे निधन

Dr. Sureshchandra Lalwani passed away

डॉ. सुरेशचंद्र ललवानी यांचे निधन
X

यवतमाळ - डॉ. सुरेशचंद्र भंवरलालजी ललवानी (जैन) मुलनिवासी इच्छापुर हल्ली मुक्काम कळंब यांचे आज दि. 23 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता हृदयविकाराने पुणे येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. 24 शनिवारी सकाळी 8.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे सुभाषचंद्र, राजेंद्र, सुशिल, खुशालचंद्र, पवन, संदिप, सुरेंद्र, मयुर ललवानी आदि त्यांच्या कुटूंबात आहेत. आज दि. 24 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता उठावणा असून 4 वाजता पगडी रस्म आहे. घटस्थाना असल्याने सर्व कार्यक्रम दि. 24 ला एकाच दिवशी आहे. डॉ. सुरेश ललवानी हे भारतीय जैन संघटनेचे कळंब तालुक्यातील मुख्य आधारस्तंभ होते. सकल जैन समाजात साधुसंतांमध्ये ते सदैव सेवेकरीता तत्पर राहात होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ होत आहे.

Updated : 23 Sep 2022 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top