बांधावर जायचे सोडून पालकमंत्री कृषी महोत्सवातील भाषणात मश्गूल - देवानंद पवार यांची टिका
Criticism of Devanand Pawar - Devanand Pawar's comments on Mashgool's speech at the Agriculture Festival instead of going to the dam
X
प्रतिनिधी यवतमाळ
अतिवृष्टीमुळे यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी आधीच प्रचंड अडचणीत आला आहे. आता तर अवकाळी पाऊस, वादळी वारा तसेच गारपीटीमुळे जिल्हयात अनेक भागात शेतक-यांचे रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बांधावर जाऊन शेतक-यांना धीर द्यायचे सोडून कृषी महोत्सवात भाषण ठोकायला उपस्थित राहणा-या पालकमंत्री संजय राठोड यांचे वर्तन शेतक-यांमध्ये चीड निर्माण करणारे असल्याची टीका कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. अशा परिस्थितीत जे उत्पन्न झाले त्यालाही भाव नसल्याने मोठया प्रमाणात शेतक-यांच्या घरात अजुनही शेतमाल पडून आहे. कापसाचे भाव सात हजाराच्या आसपास आले आहे. याशिवाय सोयाबिन, हरभरा, तुर यासह सर्वच पिकांचे भाव पडल्याने शेतक-यांच्या अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. मार्च एंडींग मुळे बॅंकांकडून पिक कर्ज वसूलीसाठी तकादा लावला जात आहे. कर्ज फेडण्याची इच्छा असतांनाही भाव नसल्याने त्यासाठी कवडीमोल भावात माल विकण्याची शेतक-यांची इच्छा नाही. खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न रब्बी हंगामात करण्यात आला. मात्र गहू काढण्याच्या स्थितीत असतांना वादळी वारा तसेच गारपीटीमुळे पुन्हा शेतक-यांचे कंबरडे मोडले. सरकारने अशा परिस्थितीत शेतीच्या बांधावर जाऊन शेतक-यांना धीर देणे गरजेचे असतांना पालकमंत्री संजय राठोड मात्र कृषी महोत्सवात जाऊन भाषण ठोकण्यात मश्गुल होते. त्यांचे हे वर्तन चीड आनणारे आहे. खरे तर संकटाच्या काळात या कृषी प्रदर्शनीची काय गरज होती. तसेही या कृषी प्रदर्शनीकडे वाचाळवीर कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी पाठ फिरवली आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचे तर दर्शन दुर्लभ झाले आहे. मतांचे राजकारण करतांना खासदार भावना गवळी यांना लेंगी नृत्य करायला वेळ मिळतो, मात्र शेतीच्या बांधावर जायला वेळ मिळत नाही हे दुर्भाग्यपुर्ण आहे. केन्द्रातील भाजप व राज्यातील “ईडी” सरकारवर शेतक-यांचा विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे या महोत्सवाकडे शेतकरी पाठ फिरविणार हे लक्षात आल्याने नाचक्की टाळण्यासाठी शासकीय यंत्रनेचा दबाव टाकून आशा वर्कर व बचत गटाच्या महिलांना बोलविण्यात आले होते. खरे तर या महोत्सवामध्ये शेतक-यांच्या तंत्रज्ञानापेक्षा बचत गट तसेच खाद्य पदार्थांच्या स्टॉलचाच भरणा मोठया प्रमाणात दिसून आला. त्यामुळे या महोत्सवातून शेतकरी कोणता बोध घेणार? असा प्रश्नही देवानंद पवार यांनी उपस्थित केला आहे.
कर्मचा-यांनी सर्वेक्षणासाठी बांधावर जावे
शासकीय कर्मचा-यांची जुन्या पेंशन ची मागणी रास्त आहे. या मागणीसाठी त्यांनी सुरु केलेले आंदोलन सुरुच ठेवावे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे कर्मचा-यांनी आंदोलनासोबतच सर्वेक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. जगाचा पोशींदा जगला तर आपण जगु हे लक्षात ठेवावे. आंदोलन कायम ठेवत सर्वेक्षणाची जबाबदारी कर्मचा-यांनी पुर्ण करावी असे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे.