Home > Maharashtra news > पुसद‌ येथे भाजपा जैन प्रकोष्ठ अंतर्गत कॅन्सर रोग निदान शिबिर संपन्न..!

पुसद‌ येथे भाजपा जैन प्रकोष्ठ अंतर्गत कॅन्सर रोग निदान शिबिर संपन्न..!

"कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान"* हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

पुसद‌ येथे भाजपा जैन प्रकोष्ठ अंतर्गत कॅन्सर रोग निदान शिबिर संपन्न..!
X

पुसद‌ येथे भाजपा जैन प्रकोष्ठ अंतर्गत कॅन्सर रोग निदान शिबिर संपन्न..!

"कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान"* हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

प्रतिनीधी/पुसद - भाजपा जैन प्रकोष्ठ कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत पुसद‌ येथे आज दि.२१ जून २०२२ रोजी भारतीय जनता पार्टी पुसद व भारतीय जनता पार्टी जैन‌ प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात होते.


कर्करोगाचं निदान , कर्करोगास कारणीभुत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हया उद्देशाने भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने २६ जानेवारी २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान "कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान " हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्या मध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, पोस्टेट कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि बाँकायटिस कर्करोग आदी रोगांची लक्षणे असल्यास त्यांचे ,फ्रि चेकअप ,मेमोग्राफी व यांसारख्या कर्करोगाच्या इतर तपासण्या विनामूल्य करण्यात येत आहेत. तेव्हा कॅन्सर चे प्रथम स्टेजमध्ये निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो म्हणून भाजपा जैन प्रकोष्ठ कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सामान्य नागरिकांना या आजारापासून सुटका मिळवता यावी याकरिता फुपाटे हॉस्पिटल ,तलाव‌ ले-आऊट पुसद‌ येथे सुध्दा या कॅन्सर रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन पुसद‌ भाजपा शहराध्यक्ष दिपक परिहार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा अनुसुचित जमाती मोर्चाच्या महराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ.सौ.आरतीताई फुपाटे , भाजपा ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार , IMA पुसद च्या अध्यक्षा डॉ.मंगला चव्हाण ,IMA पुसदचे माजी अध्यक्ष डॉ.संजय भांगडे ,डॅा.हरिभाऊ फुपाटे , अड.विश्वास भवरे , रवि ग्यानचंदानी , दिपालीताई जाधव ,डॉ.रुपाली जयस्वाल ,निखील चिद्दरवार ,योगेश राजे , तसेच पुसद भाजपाचे इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.Updated : 23 Jun 2022 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top