Home > Maharashtra news > *एस डी ओ शिल्पा सोनाले यांच्या हस्ते* *पशु-पक्ष्यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण*

*एस डी ओ शिल्पा सोनाले यांच्या हस्ते* *पशु-पक्ष्यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण*

*By SDO Shilpa Sonale* *Inauguration of Animal-Bird Ambulance*

*एस डी ओ शिल्पा सोनाले यांच्या हस्ते*    *पशु-पक्ष्यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण*
X

वन्यजीव रक्षक राकेश झाडे यांचा अभिनव उपक्रम

*एस डी ओ शिल्पा सोनाले यांच्या हस्ते*

*पशु-पक्ष्यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण*

इकबाल पहेलवान वर्धा जिल्हा

हिंगणघाट दि. १९ /

बेवारस अवस्थेत महामार्गावर व अन्यत्र जखमी अवस्थेत पडून राहणाऱ्या पशू-पक्षाना तातडीने उपचार मिळावेत यासाठी येथील वन्यजीवरक्षक राकेश झाडे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण रविवार दि 19 मार्चला कमला नेहरू शाळा तुकडोजी वॉर्ड येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यासाठी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश कदम,पीव्ही टेक्स्टाईलचे महाव्यवस्थापक भुपेंद्र शहाणे,डॉ प्रकाशजी लाहोटी,जीवरक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष दिगाबर खांडरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहे.

यावेळी रुग्णवाहिकेसाठी दुचाकी भेट देणारे येथील समाजसेवी सुरेंद्र बोरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.या दुचाकी रुग्णवाहिकेवर जखमी पशु-पक्षांसाठी छोटी बास्केट ठेवण्यात आलेली असून प्रथमोपचाराचे साहित्यही या रुग्णवाहिकेत आहे.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जीवरक्षक फाउंडेशन हिंगणघाट यांनी केले आहे.

Updated : 18 March 2023 8:40 AM GMT
Next Story
Share it
Top