Home > Maharashtra news > अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते सौ.दिशा निलावार यांना 'वुमन अचिव्हर्स अवॉर्ड' प्रदान

अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते सौ.दिशा निलावार यांना 'वुमन अचिव्हर्स अवॉर्ड' प्रदान

Actress Tejaswini Pandit presents 'Women Achievers Award' to Ms. Disha Nilawar

अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते सौ.दिशा निलावार यांना वुमन अचिव्हर्स अवॉर्ड प्रदान
X

यवतमाळ प्रतिनिधी : ऑन धिस टाईम मीडिया अंतर्गत निर्माण करण्यात आलेले महिलांचे हक्काचे व्यासपीठ 'माहेर कट्टा'चा राज्यस्तरीय शुभारंभ सोमवार १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात संपन्न झाला.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते यवतमाळ येथील साई इन्फोटेक मल्टीर्पपझ सोसायटी द्वारा संचालित कस्तुरी महिला मंचच्या अध्यक्षा सौ.दिशा निलावार यांना युनिव्हर्स-ओटीटी 'वुमन अचिव्हर्स अवॉर्डने' सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुबी सोशल वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष रुबिना पटेल होत्या.तसेच युनिव्हर्स महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्नेहा भरत धोटे, माधवबागचे चीफ इंप्रूव्हमेंट ऑफिसर डॉ. प्रवीण धाडीगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.ऑन धिस टाईम मीडियाचे चेअरमन संदीप थोरात, व्यवस्थापकीय संचालक कांचन बिडवे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद आंबेकर यांचीही यावेळी उपस्थित होते. 'माझं माहेर' मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऑन धिस टाईम मीडियाच्या यू-ट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक पेजवर करण्यात आले.सौ दिशा निलावार यांनी आज पर्यंत साई इन्फोटेक मल्टीर्पपझ सोसायटी द्वारा संचालित कस्तुरी महिला मंच वर्ष 2010 पासून कार्यरत आहे. कस्तुरी मंचाचा उद्देश स्त्रियांतील सुप्त गुण व कला यांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण व्हावं तसेच महिलांनी सक्षम व्हावं.कस्तुरी मंचाने विविध शिक्षण प्रशिक्षण तसेच विविध कला गायन वादन नृत्य स्पर्धा महिलांच्या या बारा वर्षात आयोजित केल्या.यवतमाळ नव्हे तर विदर्भातील बरेच महिलांना त्यांनी या स्पर्धेतून मंचाला जोडले.डान्स विदर्भ डान्स, तसेच मिस्टर अँड मिस विदर्भ, तसेच मिस विदर्भ, किड्स टॅलेंट हंट विदर्भ अशा बऱ्याच रजिस्टर् स्पर्धा कस्तुरी मंचाने घेतलेल्या आहे तसेच सामाजिक कार्यात गरजूंना सतत गरजेचे वस्तू वाटप वृक्षारोपण वृद्धाश्रमात सतत भेट मेडिकल असिस्टंट सिकलसेल पेशंट साठी महारक्तदान शिबिर तसेच सीएम रिलीफ फंड आणि आर्मी रिलीफ फंड तसेच बरेच निराधार मुलं दत्तक घेणे विविध आरोग्य शिबिरांचा आयोजन सतत बारा वर्षात नियमितपणे करत आलेला आहे.साई इन्फोटेक तसेच कस्तुरी मंचाने आदर्श गाव डोंगरगाव येथे यवतमाळ जिल्ह्यातील सर्वप्रथम डिजिटल अंगणवाडी सुरू केली.कलागुणाच्या स्पर्धेतून फक्त महिलांनाच नव्हे तर युथ आणि बाल मुला मुलींसाठी सुद्धा स्पर्धा घेण्यात आल्या व व्यासपीठ देण्यात आलं.या सर्व कार्याची व उपक्रमाची दखल घेऊन ऑन धिस टाईम मीडिया अंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये यांचा सन्मान करण्यात आला.


'माझं माहेर' मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऑन धिस टाईम मीडियाच्या यू-ट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक पेजवर करण्यात आले.'वुमन अचिव्हर्स अवॉर्ड' सौ दिशा निलावार यांना मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा होत आहे.

Updated : 23 Sep 2022 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top