Home > Maharashtra news > *हिंगणघाट वरून वर्धा जाणाऱ्या लेडी बस कँडॅक्टर यांनी केली सामाजिक कार्यकर्ता व अभिनेत्री मंगला ठक उर्फ श्री श्री राधिका यांचा सोबत गैर वागणुक* ...

*हिंगणघाट वरून वर्धा जाणाऱ्या लेडी बस कँडॅक्टर यांनी केली सामाजिक कार्यकर्ता व अभिनेत्री मंगला ठक उर्फ श्री श्री राधिका यांचा सोबत गैर वागणुक* ...

.*Lady bus conductor going from Hinganghat to Wardha misbehaved with social worker and actress Mangala Thak aka Sri Sri Radhika*

*हिंगणघाट वरून वर्धा जाणाऱ्या लेडी बस कँडॅक्टर यांनी केली सामाजिक कार्यकर्ता व अभिनेत्री मंगला ठक उर्फ श्री श्री राधिका यांचा सोबत गैर वागणुक*   ...
X

*हिंगणघाट वरून वर्धा जाणाऱ्या लेडी बस कँडॅक्टर यांनी केली सामाजिक कार्यकर्ता व अभिनेत्री मंगला ठक उर्फ श्री श्री राधिका यांचा सोबत गैर वागणुक* ...

संपादक . वर्धा जिल्हा इकबाल पहेलवान.

हिंगणघाट दि. २४ / मंगला ठक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक व निराधार संघटना त्या हिंगणघाट येथील असुन सध्या त्या मुबई येथे राहतात मंगला ठक उर्फ श्री श्री राधिका या मराठी आणि हिंदी टीव्ही सिरीयल व सिने सृष्टीत काम करत असल्या मुळे नेहमी कामा निमित्त हिंगणघाट ते मुंबई ला ट्रेन प्रवास करत असतात त्यांनी माहिती देताना त्यांचे सोबत लेडी बस कंडक्टर यांनी त्यांच्यासोबत खराब वागणूक दिल्याचे सांगितले त्या दिनांक 23, 11, 2022 ला वर्धे वरून 6 . 12 ची विदर्भ ट्रेन पकडायची होती त्यामुळे हिंगणघाट वरून एस. टी . महामंडळ चे बस नी निघाले त्या बस मधे एक महिला कंडक्टर होती त्यांनी तिला विचार पुस केले बस कितीला वर्धा पोहचते तर त्या बोलल्या 1 तासात पोहचेल ताईंनी तिला म्हटले 6, 12 ची ट्रेन पकडायची आहे बजाज चौक वर्धा उतरता येईल का म्हणजे मी तुरंत रिक्षा पकडून वेळेत पोहचेल तर त्यावर त्या बोलल्या हो ड्राइवर साहेबांना सांगा . नंतर ड्राइवर साहेब आले ताईंनी ड्राइवर ला विनंती केली तर ते बोलले ठीक आहे थांबेल गाडी 5 वाजता हिंगणघाट वरून निघाली धोत्रा स्टाफ वर या कंडक्टर बाईच्या मैत्रिणी यायच्या आहे म्हणून 5 मिनिट बस थांबवली मग वर्धा बस पोहचल्यावर सामाजिक कार्यकर्ता मंगला ताई बस मधून उतरण्यास उभ्या झाल्या असता कंडक्टर बाईंनी बस थांबण्यास मनाई केली ओरडली आता बजाज चोक ला नाही सरळ बस स्टँड लाच उतारा सहाच वाजले त्यावर मंगला ताई बोलल्या हो सहाच वाजले पण मला रेल्वे स्टेशन ला पोहचायला पण वेळ लागेल आणि मी तुम्हाला हिंगणघाट वरून बसताना च तुम्हाला विचारले तर तुम्हीच बोलल्या की ड्राइवर साहेबांना विचारा ... ड्राइवर साहेबांनी गाडी थांबवली होती तरीही त्या कंडक्टर बाई नी तमाशा केला व दार उघडले नाही आणि मंगला ताईंशी हुज्जत बाजी करू लागली व बस मधून उतरू दिले नाही . त्या जास्तच शिवीगाळ करत होत्या म्हणून त्यांनी कंडक्टर चां फोटो घेतला तर तिने मंगला ताईचा मोबाईल हिसकावून घेतला आणि हुजत बाजी करत शिवी गाळ करू लागली . जाण्यास घाई होत होती आणि ट्रेन चां पूर्ण वेळ झाला आणि ती मोबाईल देत नव्हती देत नव्हती त्या ओढातानित ताईंचा ड्रेस पण फाटला आणि सरळ बस स्टॉप ला बस थांबवली त्या बस मधून उतरल्या तरी लेडी कंडक्टर ची शिवीगाळ सुरूच होती .

एक बस कंडक्टर नी बस मधील पॅसेंजर ला अशी वागणूक द्यावी ही शोभेची गोष्ट नाही आणि आपल्या नोकरीचा गैर फायदा उचलत लोकांचा मनाशी खेळणं , त्यांच्या भावना दुखावणे , लोकांचे समोर तमाशा करून बेइज्जत करण अशी बेशिस्त वरतवणुक देणं कितपत योग्य आहे . या लोकांची अशी अरेरावी अनेक लोकांना अडचणीत आणू शकते अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी नौकरी करत असताना जर लोकांशी अशी वागणूक देत असेल तर यांना त्या नौकरी वर ठेवत असताना आधी यांचा वर्तणुकीची सुध्धा चौकशी व्हायला पाहिजे . सामाजिक कार्यकर्ता मंगला ताई ठक यांनी सांगितले

या बाईचे मला नाव माहीत नाही आहे आणि मी ट्रेन पकडण्याच्या धावपळीत गाडीचा नंबर पण घेतला नाही परंतु मी माझाकडे काहीही पुरावा नसल्या मुळे मी तिचा फोटो घेतला आहे . एका सामाजिक चळवळीतील महिलेशी असली हिन वागणूक सार्वजनिक ठिकाणी दिल्या प्रकणी मी पोलिसात हीची तक्रार देत आहे . मी महीला असून ही माझाशी अशी वागणूक देते जर माझा ठिकाणी एक पुरुष असता तर याच महिलेने त्या माणसावर उलट सुलट आळ घेऊन आपला बाई होण्याचा फायदा उचलला आता अशा कित्येक घटना ना पुरुष बळी पडतात अशा लोकांना वेळीच आवर घालत नाही त्यामुळे अश्या प्रकरणाचा वाव मिळतो अशा मुज्जर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे .

Updated : 24 Nov 2022 1:43 AM GMT
Next Story
Share it
Top