Home > Maharashtra news > सिमेंन्ट व लोहा चोरीचा गुन्हा उघड, एकुण 6,15,500 रू चा माल जप्त, पो.स्टे. हिंगणघाट येथील डि.बी. पथक क्र. 1 ची कामगीरी

सिमेंन्ट व लोहा चोरीचा गुन्हा उघड, एकुण 6,15,500 रू चा माल जप्त, पो.स्टे. हिंगणघाट येथील डि.बी. पथक क्र. 1 ची कामगीरी

Crime of theft of cement and iron revealed, goods worth Rs 6,15,500 seized, P.St. DB from Hinganghat. Squad no. Performance of 1

सिमेंन्ट व लोहा चोरीचा गुन्हा उघड, एकुण 6,15,500 रू चा माल जप्त, पो.स्टे. हिंगणघाट येथील डि.बी. पथक क्र. 1 ची कामगीरी

हिंगणघाट. दि २५ / फिर्यादी शिवराज विजया शिंदे रा. वर्धा यांचे मौजा वाघोली येथे जल जिवन मिशन या योजने अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ठेवुन असलेले बांधकाम साहीत्य उर्वरीत अंबुजा कंपनीचे सिमेन्टच्या 150 बॅग किंमत 52,500 रू. व 9 क्विंटल लोहा किमंत 63,000 रू. असा एकुण जु.कि 1,15,500 रू. चा माल. फिर्यादीचे कामावर असलेले ठेकेदार यांनी संगणमत करून चोरून नेले आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हा दाखल होताच पोस्टे हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथक क्र. 1 हे तपासात वाशिम येथे रवाना होवुन आरोपीतांचा शोध घेतला असता, सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) अक्षय श्रीमंत फंड वय 26 वर्ष रा. अंधापुरी, गुंज खुर्द, ता. पाथरी जि. परभणी 2) सागर सर्जेराव मोरे वय 32 वर्षे रा. शिवाजी नगर, सुटाळा बुद्रुक, ता. खामगाव जि. बुलढाणा, ह.मु. श्री जवादे यांच्या घरी तोडकर नगर, पॉलीटेकनिक कॉलेज समोर, वाशिम जि. वाशिम येथे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना अटक करून, गुन्हयात विचारपुस करून त्यांचेकडुन चोरीस गेलेला संपूर्ण मुददेमाल व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण जु.कि. 6,15,500 रू. चा माल जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. नरेन्द्र डहाके, नापोशि सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले, व सायबर पोस्टे चे नापोशि दिनेश बोथकर यांनी केली आहे.

Updated : 25 March 2023 9:52 AM GMT
Next Story
Share it
Top