Home > M marathi report > निविदा सुचनाक्र. 18 मधील कामे अखेर रद्द

निविदा सुचनाक्र. 18 मधील कामे अखेर रद्द

Tender Instruction No. Works in 18 finally cancelled

निविदा सुचनाक्र. 18 मधील कामे अखेर रद्द
X

यवतमाळ- सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद ने काढलेल्या निविदा सुचना क्र. 18 मधील सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्याकरीता असलेल्या 21 कामांकरीता Geotagging ची अट घातल्याबाबत तसेच या अटीमुळे निकोप स्पर्धेस बाधा उत्पन्न होत असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यामुळे शासन संकेतस्थळावरील अपलोड झालेली कामे अखेर रद्द करण्यात आली आहेत. याबाबतचे पत्र सहायक अधिक्षक अभियंता प्रीती मस्के यांनी नुकतेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना पाठविले आहे. यामध्ये सदर निविदेबाबत खुलासाही मागण्यात आला आहे, तसेच प्रपत्र सुधारीत करून फेरनिविदा प्रकाशीत कराव्यात, नियमभंगाबाबत चौकशी करावी आणि उचित कारवाई करण्याचे निर्देश या पत्रामध्ये देण्यात आले आहेत.

Updated : 3 Dec 2022 12:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top