- आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच
- लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला
- उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत
- बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर
- चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्हा सज्ज - माजी महापौर राखी कंचर्लावार चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा.
- आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.
- सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
- वडगाव परिसरातील मटका अड्ड्यावर धाड, 8 जणांना अटक
- यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
- नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या- बाळासाहेब मांगुळकर

राजूदास जाधव यांच्या सहकार पॅनलचा सुपडासाफ
Supasasaf of Rajudas Jadhav's co-operation panel
X
यवतमाळ- गेल्या २१ वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या राजूदास जाधव यांच्या सहकार पॅनलचा यंदाच्या निवडणुकीत सुपडासाफ झाला आहे. सोमवार, ४ जुलै रोजी गुरुदेव मंगल कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत परिवर्तन पॅनलचा करिष्मा दिसून आला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परिवर्तन पॅनलचे २१ संचालक निवडूण आल्याचे अधिकृत घोषणा करताच ढोल, ताशे वाजवत गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याचे मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली नव्हती. तरीसुद्धा ढोल, ताशे, गुलाल कार्यकर्त्यांनी आणून ठेवला होता. मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास व्ही. व्ही. रणमले यांनी विजयी उमेदवारांचे नावे घोषित केली. त्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी ढोल, ताशे, फटाके फोडून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तब्बल २१ वर्षांनंतर प्रथमच परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासून दबदबा कायम ठेवल्याचे दिसून आले. सर्व संचालकांसह समर्थकांनी बसस्थानक चौकापर्यंत विजयी रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. एकंदरीत यंदाच्या निवडणुकीत राजूदास जाधव यांच्या सहकार पॅनलला चांगलाच धक्का बसल्याचे स्पष्ट झाले.