Latest News
Home > M marathi report > सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा

सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा

जि.प.कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दारुण पराभव

सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
X

यवतमाळ प्रतिनिधी दि.५ जुलै -: जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. र.नं. १०९ ही कर्मचाऱ्यांसाठीची महत्वाची बँक आहे. कोरोना निर्बंधामुळे एक वर्ष उशिराने बँकेची निवडणुक घेण्यात आली. यामध्ये सहकार पॅनल विरुध्द परिवर्तन पॅनल अशी सरळ लढत झाली. काल निवडणुकीसाठी मतदान झाले तर आजच्या मतमोजणीमध्ये २१ वर्ष बँकेवर सत्ता असलेल्या सहकार पॅनलचा परिवर्तन पॅनलने दारून पराभव केला. संचालक मंडळाच्या २१ जागांवरही परिवर्तन पॅनलने एकहाती विजय मिळविला आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मागील २१ वर्षांपासून राजुदास जाधव यांच्या नेतृत्वातील गटाच्या हाती होती. संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने पतसंस्थेची निवडणुक लावण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये सहकार नेते म्हणून ओळख असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक राजुदास जाधव यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनल तर कायम परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या कार्यरत शिक्षक मधुकर काठोळे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लढण्यात आली. यावेळी सहकार

पॅनलकडून आपल्या कार्यकाळामध्ये पतसंस्थेचा कसा विकास करण्यात आला याबाबत मतदारांपुढे बाजु मांडण्यात आली तर परिवर्तन पॅनलकडून कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेचे खासगीकरण करण्याचे षडयंत्र असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे जाहीर आरोपही परिवर्तन पॅनलकडून करण्यात आले. निवडणुकीसाठी ३ जुलै रोजी मतदान घेण्यात आले तर आज ४ जुलै रोजी दारव्हा रोड येथील गुरुदेव मंगल कार्यालय येथे मतमोजणी करण्यात आली. यावेळी सुरुवातीपासून परिवर्तन पॅनलने मतमोजणीमध्ये आघाडी घेतली होती, ती आघाडी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत कायम राहीली. या निवडणकीमध्ये परिवर्तन पॅनलने २१ही जागांवर विजय मिळविला, सहकार पॅनलला एकही जागा राखता आली नाही. ठेविदार गटामध्ये चार टर्म पतसंस्थेचे अध्यक्ष राहीलेल्या राजुदास जाधव यांना २८८३ मते घेतली तर विजयी उमेदवार पोपेश्वर भोयर यांना ३७७८ मते घेतली. निवडणुकीमध्ये मधुकर काठोळे, पोपेश्वर भोयर, संजय गावंडे, मुकेश भोयर, सुभाष धवसे, गजानन पोयाम, विलास टोंगे, शरद घारोड, सचिन ठाकरे, तुलशीदास आत्राम, अभिजीत ठाकरे, स्वप्नील फुलमाळी, विनोदकुमार कदम, नदिम पटेल, तेजस तिवारी, अशोक चटप, महेश सोनेकर, संजय बिहाडे, प्रदिप मोहटे, सुनिता गुघाणे, विजया राऊत यांनी बहुमतानी विजय मिळविला.

Updated : 5 July 2022 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top