Home > M marathi report > मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारसह गावखेड्यात आणी शहरात मुन्नाभाई MBBS.......

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारसह गावखेड्यात आणी शहरात मुन्नाभाई MBBS.......

झोलाछाप (बोगस) डाॅक्टरचे फुटले पेव;प्रशासनाची अर्थपुर्ण डोळेझाक?

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारसह गावखेड्यात आणी शहरात मुन्नाभाई MBBS.......
X

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारसह गावखेड्यात आणी शहरात मुन्नाभाई MBBS.......

झोलाछाप (बोगस) डाॅक्टरचे फुटले पेव;प्रशासनाची अर्थपुर्ण डोळेझाक?

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील बोगस डाॅक्टरवर प्रशासनाची कारवाई;माञ लॅबविषयी मौन

त्या बोगस दवाखान्यातील लॅब आणी मेडीकलवर माञ कारवाई नाही,चर्चांना ऊधान

(फुलचंद भगत)


वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील मुन्नाभाईवर (बोगसाडाॅक्टर) प्रशासनाने कारवाई केली माञ तेथीलच लॅब आणी मेडीकलवर माञ बोलण्यास व कारवाई करण्यात न आल्याने विविध चर्चांना ऊधान आले आहे.मिळालेल्या माहीतीनुसार शेलुबाजार येथील सचिन क्षिरसागर नामक बोगस डाॅक्टरवर अनधिकृत दवाखाना चालवण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले परंतु तिथे लॅबही होती.सदर लॅबचा परवाना होता का?मेडीकलचे लायसनधारक मेडीकलमधे हजर होते की दुसरेक कुणी चालवत होते? हे प्रश्न माञ अनुत्तरीतच ठेवल्याने या कारवाईबाबत जनमानसात सभ्रमावस्था निर्माण झाली आहे.वरिष्ठ प्रशासनाने यातील खरे शोधुन सबंधितावर आणी त्यांना पाठीशी घालणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.


मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे २१ नोव्हेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकाने बोगस डॉक्टरवर कारवाई केली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद भगत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २१ नोव्हेंबर रोजी दुपारी सचिन बबन क्षीरसागर याच्या शेलूबाजार येथील दवाखान्याची तपासणी केली असता पात्रता नसताना तो अवैधरीत्या दवाखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून काही औषधी व साहित्य जप्त करण्यात आले.


क्षीरसागर याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७६, ४१९ व सहकलम ३३ (२),३२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय मंजूषा मोरे करीत आहेत. आरोग्य विभागाच्या या धडक कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

अनधिकृत लॅबवर कारवाई कधी?

सचिन क्षीरसागर यांच्या हॉस्पिटलमध्ये अनधिकृत लॅब सुध्दा सुरू होती असे मिळालेल्या माहीतीवरुन कळले.असे असतांना त्या लॅब धारका कङे महाराष्ट्र पॅरामेङीकल कौन्सिल चे रजिष्ट्रेशन असने आवश्यक आहे.सदर रजिष्र्टेशन भरारी पथकातील अधिकार्‍यांनी तपासले का?का ती लॅब सुध्दा बोगस होती?जर बोगस असेल तर त्या लॅब संचालका वर का कारवाई करण्यात आली नाही? कारण ती लॅब सुध्दा बोगस कागदपत्रे लावून बिन बोभाट पणे रूग्णांनची लुट सुरू होती अशी परिसरात चर्चा होती.त्वरित अशा बोगस हॉस्पिटल व लॅब ला सील करून त्या लॅब संचालका वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे. क्लिनिकल लेबॉरेटरी चालवतांना इतर पॅथी प्रमाणे महाराष्ट्र पॅरामेङीकल कौन्सिल चे रजिष्ट्रेशन क्लिनिकल लेबॉरेटरी चालविण्या करिता अनिवार्य आहे. तसेच त्या लेबॉरेटरी संचालका कङे बोगस रजिष्ट्रेशन नंबर टाकुन बिनधास्तपने व्यवसाय करित होता असे असे कळले आहे.असा प्रकार करने सुध्दा गंभीर गुन्ह्या पेक्षा कमी नाही आहे.त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने हे प्रकरण गंभीरतेने घेवुन रुग्नांच्या जीवाशी खेळणार्‍या झोलाछाप मुन्नाभाईवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

तक्रार आल्यावरच प्रशासन बोगस डाॅक्टरवर कारवाई करते का?

मंगरुळपीरमध्ये व शेलुबाजारमध्ये बोगस मुन्नाभाई असल्याने डाॅक्टर संघटनेने लेखी निवेदनासह सर्व सबंधित प्रशासनाला कळवले होते.तसेच नाव आणी लोकेशनचीही माहीती दिली असतांनाही बोगस डाॅक्टरवर कारवाई केल्या जात नसल्याने प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जिथे तक्रारीचा रेटा जास्त असेल तिथेच कारवाई होते असा आरोपही प्रशासनावर होत आहे.

मेडीकलचीही झाडाझडती भरारी पथकाने घेण्याची गरज

शासकीय नियमानुसार मेडीकल चालवतांना ज्यांचा परवाना असतो तो व्यक्ती मेडीकलमध्ये हजर असुन त्यांच्या सुपरव्हिजनखाली रुग्ंना औषधगोळ्या दिल्या गेल्या पाहिजे.परंतु मेडीकलचा परवाना एकाचा चालवतो दुसराच अशी अनेक ठिकाणी अवस्था असल्याने प्रशासनाने याविषयी शहानिशा करावी व दोषीवर कारदेशीर कारवाई करणे गरजेचे असल्याचे जनतेचे म्हणने आहे.

आरोग्य विभागातील शासकीय कर्मचारीही खाजगी दवाखाने चालवित असल्याची चर्चा

आरोग्य विभागातील काही कर्मचारीही खाजगी दवाखाने चालवित असुन तसेच आपल्या कर्तव्याच्या वेळात खाजगी दवाखान्यात रुग्नतपासणी व ऊपचार करीत असल्याचीही परिसरात चर्चा आहे.अशा शासकीय नियमांचे पालन न करणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 23 Nov 2022 3:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top