Home > M marathi report > पाच हजार शिव भोजन थाळीनी भागविली गरजूंची भुक (अजूनही शिवभोजन थाळीचे वाटप सुरूच )

पाच हजार शिव भोजन थाळीनी भागविली गरजूंची भुक (अजूनही शिवभोजन थाळीचे वाटप सुरूच )

Five thousand Shiva food plates satisfy the hunger of the needy (Distribution of Shiva food plates still continues)

रितेश भोंगाडे/ राळेगाव

१५ एप्रिल पासून तर आजपर्यंत राळेगाव शहरात असलेल्या शिवभोंजन थाळी केंद्रावर ५००० शिव भोजन थाळी देण्यात आली असून या शिवभोजन थाळीने यांनी अनेक गरीब गरजूंची भूक भागवली आहे कोरोनाविषाणू चा उद्रेक झाल्याने संपूर्ण राज्यामध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली हे संकट न भूतो न भविष्यती असे आहे आहे या लॉकडाऊनचा परिणाम थेट लोकांच्या रोजगार आणि व्यवसायावर झाला असून हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती अधिकच बिकट आणि दयनीय झाली आहे. मात्र अशा सर्वांच्या मदतीला धावून आले ते शिवभोजन योजनेची थाळी

राळेगाव शहरातील रावेरी पॉईंट येथे शिव भोजन थाळी केंद्र असून या केंद्रातून दररोज शंभर च्या वर शिवभोजन थाळी चे वाटप केल्या जात आहे त्यामुळे शिव भोजन थाळी योजना आरंभापासून सर्वांना आधार देणारी ठरली आहे.१५ एप्रिल पासून तर आत्तापर्यंत जवळपास पाच हजार ते पाच हजार पाचशे शिव भोजन थाळीचे गरजूंना मोफत वाटप झाले आहे वाटीभर वरण, एक भाजी, भात, आणि चपाती या शिवभोजन थाळी च्या माध्यमातून दिले जाते कोरोना विषाणूच्या उद्रेक काळात उपलब्ध आणि सकस अन्न या निमित्ताने शहरातील गरजू आणि गरीब जनतेला देण्याचे काम शिवभोजन थाळी योजनेच्या रूपाने सुरू आहे या योजनेने अनेकांची भूक भागविली आहे त्यामुळे कठीण काळात गरजू लोकांचा आधार म्हणून शिव भजन थाळी चा आधार गरीब व गरजूना मिळाला असल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. राज्य शासनाने असाच विस्तर ग्रामीण भागात केला तर ग्रामीण भागातील अत्यन्त गरजू व गरीब जनतेची सोय होणार आहे. ( कोरोना काळात गोरगरीब जनतेला शिव भोजन थाळी चा मोठा आधार मिळाला आहे राज्य सरकारच्या आदेशानुसारच १५ एप्रिल २०२१ पासून मोफत शिव भोजन थाळी चालू केली असून रोज शिव भोजन थाळी घेण्याकरिता शहरातील गरीब व गरजू लोकांना शंभर च्या वर शिवभोजन थाळी चे वाटप करण्यात येत आहे )

मनोज भोयर

शिवभोजन थाळी मालक

Updated : 22 Jun 2021 10:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top