Latest News
Home > M marathi report > ग्रामपंचायतच्या मुळ दस्तऐवजामध्ये फेरबदल करुन खोटे दस्तऐवज तयार;ग्रा.पं.सदस्य प्रितम भगत यांची तक्रार

ग्रामपंचायतच्या मुळ दस्तऐवजामध्ये फेरबदल करुन खोटे दस्तऐवज तयार;ग्रा.पं.सदस्य प्रितम भगत यांची तक्रार

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याची मागणी

ग्रामपंचायतच्या मुळ दस्तऐवजामध्ये फेरबदल करुन खोटे दस्तऐवज तयार;ग्रा.पं.सदस्य प्रितम भगत यांची तक्रार
X

ग्रामपंचायतच्या मुळ दस्तऐवजामध्ये फेरबदल करुन खोटे दस्तऐवज तयार;ग्रा.पं.सदस्य प्रितम भगत यांची तक्रार

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याची मागणी

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील गटग्रामपंचायत चांभई बालदेवचे मुळ दस्तऐवजामध्ये स्वतःच्या फायद्याकरीता फेरबदल करुन खोटे दस्तऐवज तयार केल्यामुळे संबधित सरपंच,शिपाई यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रा,पं.सदस्य प्रितम भगत यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

सदर निवेदनात नमुद आहे की,जुलै २०२१ ची मासिक सभा कोणतेही सबळ कारण नसतांना घेतली नाही.सबंधित सभेची नोटीसही ग्रा.पं.सदस्यांना दिली होती.तरीही सभा घेतली नसल्याने सबंधित सरपंचास पदावरुन निष्काशीत करण्याची मागणीही जिल्हाधिकारी यांना केली होती.प्रकरण अंगलट येवु नये म्हणून जुलै २०२१ चे खोटे प्रोसेंडिग बुक तयार करुन त्या बुकवर जुलै २०२१ ची मासिक सभा घेण्याचे दर्शवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.महाराष्ट ग्रामपंचायत अधिनियमा अंतर्गत दुय्यम प्रोसेडिंग बुक तयार करण्याचे काम सरपंच यांना नाही तसेच सबंधित सचिव गैरहजर असले तरी ग्रामपंचायतचे प्रोसेडिंग बुक हे सचिव कार्यालयातुन घरी नेत नाही.तरीही सरपंच पद जावु नये म्हणून खोटे प्रोसेडिंग बुक तयार करुन त्यावर सभा घेतल्याचे दर्शवले आहे.दि.२७ मे रोजी यासंदर्भात ग्रा.पं.सदस्य भगत यांनी केलेली आहे.यासंदर्भात प्रशासकीय स्तरावरुन चौकशी सुरु असुन लेखी जबाब आणी पुरावे जमा करणे सुरु आहे.चौकशीअंती सबंधित दोषी असणार्‍यांवर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 22 Jun 2022 8:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top