Home > M marathi blog > समाजकार्यात मदतीला धावून जाणारा तरुण अवलिया.

समाजकार्यात मदतीला धावून जाणारा तरुण अवलिया.

Young Avaliya running for help in social work.

समाजकार्यात मदतीला धावून जाणारा तरुण अवलिया.
X

संपादक झाकीर हुसेन - 9421302699

----------------------------------------------------

श्री.संतोष सिताराम डाकवे

वाढ दिनविशेष.

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

8080532973.

----------------------------------------------------

"नाही" हा परवलीचा शब्द त्यांच्या

तोंडात कधी येत नाही.चेहऱ्यावरती सातत्याने असणारे स्मित हास्य,तोंडात साखरेचा गोडवा घेऊन डोक्यावरती थंडगार बर्फ ठेवून,तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या विविध लोकांना सढळ हाताने शासकीय कामात मदत करणारा तरुण अवलिया म्हणून,श्री.संतोष सिताराम डाकवे सध्या गगनबावडा तालुका परिसरात प्रसिद्ध आहेत.शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले श्री.डाकवे यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाशी निगडित आहे.


कोल्हापूर गगनबावडा गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे मध्यभागी,आसळज कॅन्टीन शेजारच्या,रस्त्याला लागून आत मध्ये

कुंभी नदी च्या पैलतिरावर ती संथपणे वाहणाऱ्या पाण्याच्या काठावरती,

पळसंबे गावाची हद्द सुरू होते.

पळसंबे तालुका गगनबावडा हे त्यांचे


मूळ गाव.पळसंबे येथील रामलिंग मंदिर व पांडव कालीन लेणी यांचे ठिकाण, भुताचा वाडा अर्थात,गगनबावडा चे [जाहगीरदार]श्रीमंत रामचंद्र अमात्य पंत बावडेकर सरकार यांनी बांधलेला जुनाट वाडा,सध्या या वाड्याची ओळख

[भुताचा वाडा] म्हणून प्रसिद्ध आहे.


या वाड्याचे समोर असणारा पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना,आणि पळसंबे गावचा सभोवताली असणारा उसाचा

हिरवागार शेतमळा विविध शेतकऱ्यांचा.

सह्याद्रीच्या कडेकपारीतील जंगल खोऱ्यातील,हिरव्यागार गर्द झाडी झुडपातून,दळून गेलेलं ते गाव म्हणजे पळसंबे.विविध वाड्या वस्ती व बलुतेदारी यांनी आदिवास केलेलं पळसंबे छोटसं टुमदार गाव पर्यटनाच्या गगनबावडा तालुक्यात नकाशा वरती आहे.

श्री. डाकवे हे सध्या पंचायत समिती गगनबावडा येथे काम करत आहेत.


लहानपणापासून त्यांना समाजकार्याची आवड असले ने सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी अग्रेसर असा पुढाकार असतो.धार्मिक कार्यक्रम रक्तदान शिबिरे,


जयंती उत्सव,गावातील विविध तरुण मंडळाच्या मध्ये त्यांचा असलेला जोरकस असा संपर्क,पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांचा तालुक्यातील विविधांगी,शासकीय कामासाठी येणाऱ्या जनतेशी असणारा दांडगा संपर्क,मनमिळावू स्वभाव,चेहऱ्यावरती हसरे भाव,तोंडात साखर व डोक्यात बर्फ ठेवून,त्यांचे सुरू असणारे सामाजिक व प्रशासकीय काम लक्षवेधी आहे.


तरुण युवकांना संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण काम,विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून श्री डाकवे यांनी केले आहे.प्रत्येकाच्या मदतीला ते नेहमी धावून जातात.शेती क्षेत्राबरोबर,क्रिकेटचा खेळ खेळणे,कुस्तीचा खेळ बघणे,आदीसह नदीमध्ये पोहण्याचा त्यांना छंद आहे.याबरोबरच त्यांना पर्यटनाची देखी लखूप मोठी आवड आहे.


गगनबावडा तालुक्यातील वैविध्यपूर्ण नटलेला,दर्या डोंगर खोऱ्यामध्ये विभागलेला,घनदाट जंगल परिसरामध्ये आढळली जाणारी विविध वनौषधी,तालुक्यांमध्ये बारमाही दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या,या सर्वांचा विचार करून,तालुक्यांमध्ये औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी,याकरिता विविध लोकप्रतिनिधी यांचेकडे ते मागणी करताना दिसून येतात.त्यांच्या या मागणीमुळे,गगनबावडा तालुक्यात सह,शेजारील तालुक्यातील अनेक तरुण युवकांच्या हाताला रोजगार प्राप्त होऊ शकेल असा त्यांचा कयास आहे.समाजातील सामाजिक विविध प्रश्नावर ती आपली भूमिका मांडत असताना ते अगदी अभ्यासू पद्धतीने मांडतात.लहान थोरामोठ्यांच्या बरोबर

ते अतिशय आनंदाने सार्वजनिक कामात मिळून-मिसळून योगदान देतात.


सोशल मीडिया वरती प्रत्येकाच्या सुखदुःखात प्राधान्यक्रम देऊन,

ते नेहमी एक्टिव असतात.

गेल्या अडीच वर्षात कोरोना च्या वाईट काळात त्यांनी विविध स्वयंसेवी संस्थेच्या,तरुण मंडळाच्या माध्यमातून,अनेक गरजू रुग्णांना खूप मोठी महत्त्वाची मदत केलेली आहे.

आज त्यांचा वाढदिवस आहे.

त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!


संतोष डाकवे यांचा परिचय -

नाव संतोष सिताराम डाकवे,

मुलांचे नाव साईराज व राजवीर,

पत्नी शुभांगी, वडील सिताराम विठोबा डाकवे, आई सुरेखा सिताराम डाकवे.

1 ते 4 वि म पळसंबे, 5 ते 10 माध्यमिक विद्यालय असळज मध्ये शिक्षक व्ही एम पाटील व ए डी पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन, 11 ते 12 दत्ताजीराव मोहिते पाटील,विद्यालय तिसंगी श्रीमान महादेव हरी शिंदे कॉलेज वरिष्ठ महाविद्यालय तिसंगी.

विशेष मार्गदर्शन - तहसीलदार

डॉ. संगमेश कोडे व गट विकास अधिकारी श्रीमती माधुरी परीट यांचे शासकीय कामात त्यांना विशेष मार्गदर्शन लाभलेले आहे.

Updated : 15 Jun 2022 10:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top