Home > M marathi blog > आज जागतिक कुटुंब दिवस का साजरा करतात❓ वाचा‼️

आज जागतिक कुटुंब दिवस का साजरा करतात❓ वाचा‼️

Why celebrate World Family Day today ❓ Read ️

आज जागतिक कुटुंब दिवस का साजरा करतात❓ वाचा‼️
X

जाकिर हुसैन - 9421302699

म मराठी ❗स्पेशल

आज जागतिक कुटुंब दिन. १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. शांतता, विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करणारा नेमका दिवस असावा म्हणून 'जागतिक कुटुंब' दिन साजरा करण्यात येतो.

लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक करणाऱ्या महिलेने 'सिटीजन्स फॉर ग्लोबल सोल्युशन' या चळवळीद्वारे सलग १० वर्षे या दिनाचा जगभर प्रसार केला. त्यांच्या चळवळीने जागतिक कुटुंब दिनाच्या सोहळ्यात विविध उपक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली.

या चळवळीचे उद्दिष्ट 'एकत्र या, संवाद साधा, प्रोत्साहन द्या, संपर्क साधा' अशा असून, हे सारे कार्य जागतिक पातळीवरील सरकारे, विविध कार्यालये, संस्था यांच्यामार्फत व्हायला हवे, असा त्यांचा कटाक्ष असतो.

वैश्‍विक कुटुंबाला जोडणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक, सामाजिक घटकांचा कुटुंबावर पडणारा प्रभाव आणि कुटुंबाविषयी इतर मुद्‌द्‌यांना विशेष प्राधान्य देण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे.

जगातल्या प्रत्येक व्यक्तीने हा दिवस साजरा करावा, अहिंसा, शांती आणि सहभाग यासंबंधी व्यक्तिगत प्रतिज्ञा करून आपला समाज, आपले जग सुरक्षित असल्याची ग्वाही एकमेकांना द्यावी, असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागचा आहे.

Updated : 15 May 2022 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top