Home > M marathi blog > प्रेम कुणावर करावं ?

प्रेम कुणावर करावं ?

Who to love?

श्री.तानाजी सखाराम कांबळे.

8080532937.

श्रीरामाच्या भक्तीपोटी अर्धवट बोरे,

चाखणाऱ्या त्या शबरी वरती करावं!

की एका सितेपाई संपूर्ण रामायण घडवणाऱ्या

त्या रावणा वरती करावं!

प्रेम कुणावर करावं?

टेबलावरती नमस्कार बसा!

अशी पाटी लावून टेबलाखालून घेणाऱ्या

त्या अधिकारी कर्मचाऱ्यावरती कराव?

महसुलातील वेगळा वसूल गोळा करणाऱ्यांचे वर करावं!

प्रेम कुणावर करावं?

गावगाड्याच्या पंचायतत मधला मिनी कलेक्टर असणाऱ्या त्या ग्रामसेवकावर करावे?

की पिढ्यानपिढ्या गाव गाड्या वरती गटातटाचे राजकारण पेटवत ठेवणार्‍या त्या नियुक्त पंचांचे वरती करावे?

प्रेम कुणावर करावं?

घरा दारातील घाण,कचरा रस्त्यावरती टाकून ग्रामस्वच्छतेचा फुगा फोडणार्‍या अशा

नागरिकांच्या वरती करावं की,

कायद्याचे अर्धवट ज्ञान असणाऱ्या,

व गावची पाटीलकी सांभाळणाऱ्या

पोलीस पाटला वरती करावे!

प्रेम कुणावर करावे?

सबंध गाव बरं माप काढणारी,"टेलर काम"करणाऱ्या रिकाम्या,पारावरती बसणाऱ्या चांडाळ चौकडी वरती कराव की,देवळातल्या देवा वरती कायमचा हक्क सांगणार्‍या त्या पूजारी वरती करावे,

प्रेम कुणावर करावं?

मटका जुगाराच्या नादात 3 पाणी पत्यावरती,

रात्री रंगेल करणाऱ्या आशा अवलादी वरती कराव!

की,गावातल्या छप्री,रेकॉर्ड वरचे,कुळ काढणारे गावगुंड करणारे फाळकुट दादांचे वरती करावं!

प्रेम कुणावर करावं

केवळ गाव गाड्या वरच्या मोठ्या शेतकऱ्याच्या घरात धुणी भांडी करायला जाणाऱ्या त्या कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यावर ती करावं,की मागासवर्गीयांच्या नावावरती शेतीतील सर्व काही योजना लाटणाऱ्या त्या पुढार्‍यांच्या वरती करावे?

गंजत चाललेला लाईटचा खांब कोसळून पडेपर्यंत लक्ष न देणाऱ्या त्या वीज मंडळवरती करावं,की धरणांमधून विसर्ग होणारे नदी वाटे जाणारे पाणी वेळेत न सोडणार्‍या या जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे

खात्यावरती करावं?

शाळांमधील"शंकर शाळा" करणाऱ्या त्या शाळा मास्तरवर करावे?

की,लढतरीतल्या मास्तरांचे कडून

फुकटचे पेट्रोल टाकून घेणार्‍या त्या

शिक्षणाधिकारी वरती करावे?

प्रेम कुणावर करावं?

वाहतूक सुरक्षा सप्ताह च्या नावाखाली,

वाहतुकीचा रस्त्यावरती तरण्याबांड पोरांच्या, मोटरसायकली अडवून,दंडाची वसुली हप्ता वसुली सारखी वसूल करणाऱ्या,

त्या ट्राफिक हवालदारवर्ती करावं!

प्रेम कुणावर करावं?

सहकारी विकास सेवा सहकारी संस्था,

सहकारी दूध संस्था,सहकारी साखर कारखानदारी,सहकारी औद्योगिक संस्था,

सहकारी पतसंस्था,सहकारी बँका यांना सहकार हे

गोंडस नाव देऊन,सहकाराचे नावाखाली

"स्वाहाकार" साधणाऱ्या,पुढारी मंडळी वरती करावं,

यांना पाठीशी घालणाऱ्या,

सरकारी प्रशासनातील लाल फितीवर कराव!

प्रेम कुणावर करावं?

गाव गाड्या वर नेहमी सकाळी,

सावकारी व्याजाची वसुली करणाऱ्या त्या

बुलेट वाल्या पांडबा सावकारा वरती करावं,

शेती उत्पादित मालाला स्थिर हमीभाव नसल्याने,

दरवर्षी कर्जाच्या थकबाकीत राहणाऱ्या

त्या कष्टकरी शेतकरी सभासद वरती करावं!

प्रेम कुणावर करावं?

सोळावं वरीस धोक्याचं म्हणत,

ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरती

शेजारच्या गावातील पोरास घेऊन पळून जाणाऱ्या,प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या,

अशा युवक-युवतींच्या वरती करावं!

लग्नाला सहा महिने होऊन देखील हळद पिवळी होण्याअगोदरच,सासरहून कायमची माहेर वाशिन

झालेल्या त्या लेकीबाळी वरती करावे!

घरातल्या भिंतीवर च्या खुंटीवर टांगून राहिलेल्या पदवीच्या,मालकी हक्क सांगणाऱ्या त्या बेरोजगार

पदवी धरांचे वर करावं!

का नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या या

कुशल-अकुशल कारागीरांच्या वर कराव!

प्रेम कुणावर करावं?

कर्ज बुडव्यांना बँकेचा चहा पाजणा रे

त्या मॅनेजरवर करावं!

छोट्या मोठ्या उद्योगधंद्याला कर्ज मिळत नाही,

शेतकरी कुटुंबाला दुग्ध व्यवसाय साठी कर्ज मिळत नाही,

महिला बचत गटाला लघु उद्योगाला कर्ज मिळत नाही,

अशा हाताश झालेल्या गरीब घटकावर कराव!

प्रेम कुणावर करावं?

श्रीमंतांची श्रीमंती उधळत असते चपट्या नाकाच्या

चित्रविचित्र दिसणाऱ्या विलायती कुत्र्यावर दिवसागणिक!

याच खर्चात शेतकऱ्याला दोन बैल जोडी,बैलगाडी घेऊन,चांगली शेती करता येते,मात्र कुत्र्यांच्या वरती जास्तीचे प्रेम करणाऱ्या अशा मालकांच्या वरती करावे!

प्रेम कुणावर करावं?

एका माका जय भिम,

तुम भी बेकार!

हम भी बेकार!

चलो करे "जय भीम" की पुकार!

अशा हिरव्या झाडाखालच्या निळ्या

चळवळी वरती प्रेम करावं!

प्रेम कुणावर करावं?

Updated : 5 July 2022 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top